आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बोर्डाची दोनदिवसीय बैठक लंडनमध्ये शुक्रवारपासून सुरू झाली. क्रिकेटला काळिमा फासणाऱ्या फिक्सिंग, स्पॉट-फिक्सिंग यांसारखी प्रकरणे रोखण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी उपाय योजनांसंदर्भात तसेच पुढील वर्षी बांगलादेशमध्ये आयोजित ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी या मुद्यांवर बैठकीत तपशीलवार चर्चा होणार आहे. एन. श्रीनिवासन बैठकीत भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहेत. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर श्रीनिवासन यांच्यासाठी आयसीसीची ही पहिलीच बैठक असणार आहे.
गेल्या महिन्यात आयसीसीच्या प्रमुख कार्यकारी समितीची बैठक झाली होती. या बैठकीत भविष्यकालीन कार्यक्रम, पंच पुनर्आढावा (डीआरएस), एकदिवसीय सामन्यांसाठीची नवीन नियमावली या विषयांवर चर्चा झाली होती. या बैठकीतही हे मुद्दे चर्चिले जाणार आहेत.

Story img Loader