संपूर्ण जगभरात ४ मे ही तारीख ‘स्टार वार्स डे’ म्हणून चाहत्यांकडून साजरी केली जाते. ‘स्टार वॉर्स’ या चित्रपटांच्या मालिकेचा मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग आहे. त्यामुळे अनेकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटांमुळे हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्याच चित्रपटातील कल्पनेचा आधार घेत आजच्या खास दिवशी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वेगवेगळे फलंदाज चौकार ठोकताना दाखवले आहेत. पण विशेष म्हणजे त्यांच्या हातात बॅट नसून लाइट सॉबर आहेत.

“पाकिस्तानात आम्ही भारतीय स्पिनर्सची खूप धुलाई केली”

आजच्या दिवसाचे औचित्य साधून ICC ने तो व्हिडीओ बनवला आहे आणि May the 4s be with you असे झकास कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओत जोस बटलर आणि निरोशन डिकवेला यांनी केलेल्या दमदार खेळीची झलक दाखवण्यात आली आहे. याशिवाय विराट कोहली आणि ख्रिस गेल यांच्या अप्रतिम खेळीचाही समावेश करण्यात आला आहे. २०१९ च्या विश्वचषकातील विविध खेळाडूंनी विशेष प्रकारे मारलेले चौकार या व्हिडीओ ठसठशीतपणे दाखवण्यात आले आहेत.

२०१९ च्या विश्वचषकाच इंग्लंडच्या जोस बटरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये वहाब रियाझला मारलेला चौकार अशी व्हिडीओची सुरूवात आहे. याच व्हिडीओमध्ये कोहलीने वेस्ट इंडीजच्या ओशेन थॉमसला लगावलेली शानदार अप्पर-कट दाखवण्यात आलेली आहे. व्हिडीओमध्ये थायलंडच्या महिला संघाच्या खेळाडू नट्टकन चांथम हिने खेळलेला कव्हर ड्राईव्ह आणि रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर फखर झमानने खेळलेला स्वीप शॉट हेदेखील फटके समाविष्ट करण्यात आले आहेत.

विराटला गोलंदाजी की बुमराहसमोर फलंदाजी? सौंदर्यवतीने दिलं हे उत्तर

हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

Story img Loader