क्रिकेटविश्वातील आठ अव्वल संघ.. प्रत्येक संघाचा एकच ध्यास- चॅम्पियन्स होण्याचा. त्यासाठीच आजपासून १८ दिवसांमध्ये इंग्लंडच्या ‘रन’भूमीत रंगणार मनोरंजनाचा अनोखा महाकुंभ. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार असून यजमान इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यामध्ये सलामीची लढत रंगणार आहे. विश्वचषकापेक्षाही कठीण समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार आहे, कारण एखादा सामना गमावला तरी स्पर्धेतून बाहेर पडण्याची पाळी कोणत्याही संघावर येऊ शकते. त्यामुळे विजयी सलामी देण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बांगलादेशपेक्षा इंग्लंडचा संघ नक्कीच उजवा आहे. इंग्लंडला मायदेशातील वातावरणाचा, खेळपट्टय़ांचा चांगलाच अंदाज असेल. त्यामुळे त्यांच्यासाठी ही फारशी कठीण लढत नसली तरी त्यांना गाफील राहून चालणार नाही. कारण क्रिकेटविश्वातील कोणत्याही दिग्गज संघाला धक्का देण्याची कुवत बांगलादेशमध्ये नक्कीच आहे.

इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ चांगलाच समतोल असून त्यामध्ये युवा खेळाडूंचा अधिक भरणा आहे. बेन स्टोक्स हा अष्टपैलू सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात असून त्याच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. मार्क वूड, जॅक बॉल, ख्रिस वोक्स, लायम प्लंकेट यांनी आतापर्यंत घरच्या मैदानांमध्ये सातत्याने भेदक मारा केला आहे. त्यामुळे इंग्लंडला गोलंदाजीमध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार नसली तरी त्यांना फलंदाजीची थोडी चिंता असेल. मॉर्गन आणि जो रूटसारखे अनुभवी फलंदाज त्यांच्याकडे आहेत. मोइन अली आणि स्टोक्स हे दर्जेदार अष्टपैलू संघात आहेत, पण अन्य फलंदाजांना मात्र अजूनही छाप पाडता आलेली नाही.

बांगलादेशने काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेला चांगली झुंज दिली होती; पण भारताविरुद्धच्या सराव सामन्यात त्यांचा धुव्वा उडाला. मुस्ताफिझूर रहमान हा त्यांच्या वेगवान गोलंदाजीतील महत्त्वाचे अस्त्र असेल. अष्टपैलू शकिब अल हसन, तमीम इक्बाल, मुशफिकर रहिम आणि कर्णधार मश्रफी मोर्तझा यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे, पण या खेळाडूंना कामगिरीत सातत्य मात्र राखता आलेले नाही. जर या खेळाडूंनी लौकिकाला साजेसा खेळ केला तर इंग्लंडला सलामीच्याच लढतीत पराभूत करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे.

आजचा सामना

इंग्लंड वि. बांगलादेश

  • मार्क वूड (इंग्लंड) : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील सामन्यातील अखेरच्या षटकात भेदक मारा करत वेगवान गोलंदाज मार्क वूडने इंग्लंडला सामना जिंकवून दिला होता आणि तेव्हापासून तो चर्चेत आला. कोणत्याही क्षणी तिखट मारा करण्याची त्याची क्षमता आहे. चेंडूला वेग आणि उसळी देण्यात वूड पारंगत आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या सलामीच्या लढतीत वूड लक्षवेधी ठरू शकतो.
  • शकीब अल हसन (बांगलादेश) : बांगलादेशकडून सर्वाधिक सामनावीराचे पुरस्कार पटकावले आहेत ते अष्टपैलू शकीब अल हसनने. गेल्या दहा वर्षांचा अनुभव त्याच्याकडे असून संघाची मदार त्याच्यावर असेल. फलंदाजीमध्ये २८.३३ आणि गोलंदाजीमध्ये ४१.६२ ची त्याची सरासरी आहे. एकहाती सामना जिंकवून देण्याची धमकही शकीबमध्ये आहे. त्यामुळे शकीब इंग्लंडच्या रडारवर सर्वप्रथम असेल.

खेळपट्टी

  • ओव्हलची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी पोषक असल्याचे समजले जाते. गेल्या पाच सामन्यांमध्ये या मैदानात सरासरी २१५ धावा झाल्या आहेत. पहिली काही षटके गोलंदाजीसाठी पोषक असली तरी या मैदानात दोनशेपेक्षा जास्त धावा करणे कठीण नसेल. नाणेफेकचा कौल आपल्या बाजूने लागल्यावर कोणताही संघ प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करून त्यांचा डाव झटपट गुंडाळण्याची रणनीती आखू शकतो.

प्रतिस्पर्धी संघ

  • इंग्लंड : इऑन मॉर्गन (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेअरस्टोव्ह, जॅक बॉल, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, अ‍ॅलेक्स हेल्स, जो रूट, लायम प्लंकेट, आदिल रशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वूड.

  • बांगलादेश : मश्रफी मोर्तझा (कर्णधार), इम्रुल कायेस, महमुदुल्लाह, मेहंदी हसन, मोसादेक होसेन, मुशफिकर रहिम, मुस्ताफिझूर रहमान, रुबेल होसेन, सब्बीर रहमान, शकिब अल हसन, शफिऊल इस्लाम, सौम्या सरकार, सुन्झामूल इस्लाम, तमीम इक्बाल, तास्किन अहमद.

वेळ : दुपारी ३.०० वा.पासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर.