Champions Trophy 2025 Full Squads: बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. २०१७ नंतर तब्बल ८ वर्षांनंतर ही आयसीसी स्पर्धा खेळवली जात आहे, ज्याचे यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. या स्पर्धेपूर्वी अनेक संघांना महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापतींना सामोर जावं लागलं आहे. त्यामुळे संघांमध्ये अनेक बदल करावे लागले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व संघ कसे आहेत, पाहूया.

ऑस्ट्रेलिया आणि भारतासह तीन संघांमध्ये दुखापती आणि इतर कारणांमुळे उशीरा बदल करण्यात आला आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी संघात बदल करण्याची मुभा आयसीसीने दिली होती. ऑस्ट्रेलियाने पाच बदल केले आहेत, तर भारताला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीने मोठा धक्का दिला आहे.

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सहभागी होणारे सर्व संघ

अ गट
बांगलादेश

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्झिद हसन, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम, एमडी महमूदउल्ला, जाकेर अली अनिक, मेहिदी हसन मिराज, रिशाद हुसैन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ होसाई इमोन, नसुम अहमद, तन्झिम हसन साकिब, नाहिद राणा

भारत

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड

मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रुर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सियर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग.

पाकिस्तान

मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा, उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.

ब गट
अफगाणिस्तान

हशमतुल्ला शाहिदी (क), इब्राहिम झादरान, रहमानउल्ला गुरबाज, सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, इक्रम अलीखिल, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, नांग्याल खरोती, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद मलिक, नवीद झादरान.
राखीव खेळाडू: दरविश रसूली, बिलाल सामी.

ऑस्ट्रेलिया

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲलेक्स कॅरी, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, ॲडम झाम्पा.
ट्रॅव्हलिंग राखीव: कूपर कोनोली.

इंग्लंड

जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड

दक्षिण आफ्रिका

टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मार्को यानसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मारक्रम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, कार्बिन बॉश
ट्रॅव्हेलिंग राखीव: क्वेना माफाका

Story img Loader