ICC Champions Trophy 2025 Venues and Grounds: तब्बल आठ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा यंदा २०२५ मध्ये खेळवली जाणार आहे. अवघ्या दोन दिवसांवर ही स्पर्धा येऊन ठेपली आहे. ही आयसीसी स्पर्धा शेवटची २०१७ मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि आता २०२५ मध्ये या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. मात्र, भारताचे सामने दुबईत होणार आहेत. या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक कसं आहे, जाणून घेऊया.
पहिला सामना पाकिस्तान वि न्यूझीलंड या संघांमध्ये होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळवले जाणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आठ संघ खेळणार आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. या ८ संघांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण केले आहे. या दोन गटांमधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
अ गट: पाकिस्तान (यजमान), भारत, न्यूझीलंड, बांगलादेश
ब गट: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान
भारताचा समावेश असलेल्या तीन गट सामन्यांसह पहिला उपांत्य सामना दुबईत खेळवला जाईल. ९ मार्च रोजी लाहोर येथे अंतिम सामना होणार आहे. पण जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर अंतिम सामना हा दुबईत खेळवला जाईल. सेमीफायनल आणि फायनल या दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवस असतील. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० सुरू होतील. तर दुपारी २ वाजता सामन्याची नाणेफेक होईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक (ICC Champions Trophy 2025 Full Schedule)
तारीख | सामना | ठिकाण |
१९ फेब्रुवारी | पाकिस्तान वि. न्यूझीलंड | कराची, पाकिस्तान |
२० फेब्रुवारी | भारत वि. बांगलादेश | दुबई |
२१ फेब्रुवारी | अफगाणिस्तान वि. दक्षिण आफ्रिका | कराची, पाकिस्तान |
२२ फेब्रुवारी | ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड | लाहोर, पाकिस्तान |
२३ फेब्रुवारी | भारत वि. पाकिस्तान | दुबई |
२४ फेब्रुवारी | बांग्लादेश वि. न्यूझीलंड | रावलपिंडी, पाकिस्तान |
२५ फेब्रुवारी | ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका | रावलपिंडी, पाकिस्तान |
२६ फेब्रुवारी | अफगाणिस्तान वि. दक्षिण आफ्रिका | लाहोर, पाकिस्तान |
२७ फेब्रुवारी | पाकिस्तान वि. बांग्लादेश | रावलपिंडी, पाकिस्तान |
२८ फेब्रुवारी | अफगाणिस्तान वि. ऑस्ट्रेलिया | लाहोर, पाकिस्तान |
१ मार्च | दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड | कराची, पाकिस्तान |
२ मार्च | भारत वि. न्यूझीलंड | दुबई |
४ मार्च | सेेमीफायनल १ | दुबई |
५ मार्च | सेमीफायनल २ | लाहोर , पाकिस्तान |
९ मार्च | फायनल | लाहोर किंवा दुबई |
१० मार्च | रिजर्व डे |