भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स करंडक जिंकून आम्हीच ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स’ असल्याचे सिद्ध केले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कॅप्टन कुल धोनी म्हणाला, “खेळात योग्य क्लृप्त्या वापऱणाऱ्या खेळाडूपेक्षा, जो खेळाडू दबावामध्ये उत्तम खेळतो तो उत्तम खेळाडू असतो” असे म्हटले. त्याचबरोबर, “खेळात नवनवीन क्लृप्त्या वापरणारा खेळाडू उत्कृष्ट खेळाडू असतो असा सर्वजण विचार करतात पण, माझ्या मते सामन्यात दबाव असताना उत्तम खेळी करतो तो खरा उत्कृष्ट खेळाडू आहे. रोहीत आणि शिखरने प्रत्येक सामन्यात संघाला चांगली सुरूवात करून दिली आणि संघाचे क्षेत्ररक्षणही दमदार झाले आहे.” असे धोनीने स्पष्ट केले.
दरम्यान, नासिर हुसेन यांनी धोनीला तुझ्यासाठी आता कोणत्या गोष्टी साध्य करायच्या राहील्या आहेत? असा प्रश्न विचारला असता, धोनीने नेहमीप्रमाणे स्मित हास्य करत ” माझ्यासाठी पुढील प्रत्येक सामना महत्वाचा आहे. आम्ही आता वेस्ट इंडिज मध्ये तिरंगी मालिकेसाठी जात आहोत. सामना जिंकणे हे संघासाठी महत्वाचे आहे आणि संघातील खेळाडू चांगले खेळत आहेत यावर मी भरपूर खूष आहे” असे धोनी म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jun 2013 रोजी प्रकाशित
‘जो दबावामध्ये उत्तम खेळी करतो, तोच उत्कृष्ट खेळाडू’- महेंद्रसिंग धोनी
भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स करंडक जिंकून आम्हीच 'चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स' असल्याचे सिद्ध केले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कॅप्टन कुल धोनी म्हणाला, "खेळात योग्य क्लृप्त्या वापऱणाऱ्या खेळाडूपेक्षा, जो खेळाडू दबावामध्ये उत्तम खेळतो तो उत्तम खेळाडू असतो" असे म्हटले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 24-06-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc champions trophy a better player is one who responds to situations says ms dhoni