* आयसीसी चॅम्पियन्स करंडक
चॅम्पियन्स करंडकात ऑस्ट्रेलियाला मालिकेत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेविरुद्धचा पुढील सामना जिंकावा लागणार आहे. या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने आपला पराभवाचा पाढा सुरूच ठेवला, तर संघाचे मालिकेतील आव्हान संपुष्टात येईल. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने इंग्लंडच्या खेळाडूबरोबर केलेल्या असभ्य वर्तणुकीबद्दल सुरु असलेला वादंग आणि संघाने मालिकेत आपल्या खेळात गमावलेली प्रत लक्षात घेता. ऑस्ट्रेलियाचे मालिकेत टिकून राहणे कठीण होऊन बसले आहे. मालिकेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाला श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे लंकेचे करंडक मालिकेतील आव्हान संपुष्टात येईल. तसेच मोठ्या फरकाने विजय मिळविल्यास संघाच्या धावसंख्येच्या सरासरीतही वाढ होईल. त्यामुळे संघाला मालिकेत चांगली खेळी करण्यासाठीचा आत्मविश्वास मिळू शकेल.  याआधीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर मिळविलेल्या विजयामुळे पुढील सामन्यात श्रीलंका खेळाडूंवर दबाव कमी असेल. या दोन संघांची गेल्या दहा एकदिवसीय सामन्यांतील आकडेवारी पाहता, श्रीलंकेने सहा सामन्यात विजय प्राप्त केला आहे आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या एकदिवसीय मालिकेत श्रीलंका मालिका २-२ अशी बरोबरीत रोखण्यात यशस्वी झाली होती.