आयसीसी चॅम्पियन्स करंडक मालिकेत इंग्लंडवर पाच धावांनी विजय प्राप्त करत भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरले आणि ‘टिम इंडिया’ पावसात न्हाऊन निघाली पण, हा पाऊस आहे बक्षिसांचा!
आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी तसेच चॅम्पियन्स करंडक जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) भारतीय संघासाठी तब्बल १२ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यानुसार संघातील खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी व संघाच्या सहाय्यक सदस्यांना प्रत्येकी ३० लाख रुपये जाहीर करण्यात आले आहेत.
संघाचे नेतृत्व यशस्वीरित्या सांभाळण्यात महेंद्रसिंग धोनीला यश आले आहे. चॅम्पियन्स करंडक जिंकल्यामुळे भारतीय संघाच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. याचा वेस्टइंडिज येथे होणाऱ्या तिरंगी मालिकेत फायदा होईल. भारत-श्रीलंका-वेस्टइंडिज यांच्या दरम्यान तिरंगी मालिका येत्या २८ जूनपासून सुरू होणार आहे.
चॅम्पियन्स करंडक विजयी भारतीय संघावर बीसीसीआयची अर्थवृष्टी
आयसीसी चॅम्पियन्स करंडक मालिकेत इंग्लंडवर पाच धावांनी विजय प्राप्त करत भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरले आणि 'टिम इंडिया' पावसात न्हाऊन निघाली पण, हा पाऊस आहे बक्षिसांचा!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-06-2013 at 02:25 IST
TOPICSइंग्लंडEnglandक्रिकेट न्यूजCricket NewsबीसीसीआयBCCIमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoniस्पोर्ट्स न्यूजSports News
+ 1 More
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc champions trophy its raining money for the men in blue