२०१९ विश्वचषकाचा आपला पहिला सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने आश्वासक सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात, पहिल्यांदा गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. बुमराहने सलामीवीर डी-कॉक आणि आमला यांना झटपट माघारी धाडत भारताला चांगली सुरुवात करुन दिली.
यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि वॅन डर डसनने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. अखेर युजवेंद्र चहलने डसनला माघारी धाडत आफ्रिकेची जोडी फोडली. रिव्हर्स स्विपचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डसन चहलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. चहलच्या या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
Ball of the century ?
pic.twitter.com/1pXkF5KwDG#INDvSA#CWC19
— Hardik Patel (@gooljaar) June 5, 2019
आफ्रिकेला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणं त्यांच्यासाठी अनिवार्य बनलं आहे.