भारतीय संघ विंडीज विरुद्ध गुरुवारी विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचे काय समीकरण असेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या दरम्यान भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या संबंधित एक व्हिडीओ ट्विटर वर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भुवनेश्वर कुमार गोलंदाजीचा सराव करताना दिसला.
Indoors training be like #TeamIndia pic.twitter.com/JyBYqZUdXr
— BCCI (@BCCI) June 25, 2019
भुवनेश्वर कुमार हा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीला संघात खेळण्याची संधी मिळाली. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने दमदार कामगिरी करत हॅटट्रिक मिळवली. तसेच भुवनेश्वरची दुखापत गंभीर असून शकते हे लक्षात घेत BCCI ने नवदीप सैनी याला बॅक-अप गोलंदाज म्हणून बोलावून घेतले होते. पण, आज BCCI ने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये भुवनेश्वर कुमार स्वतःच इनडोअर सराव सत्रात गोलंदाजीचा सराव करताना दिसून आला.
हा पहा व्हिडीओ –
Look who’s back in the nets #TeamIndia #CWC19 pic.twitter.com/m8bqvHBwrn
— BCCI (@BCCI) June 25, 2019
टीम इंडियाचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार पाकिस्तान विरुद्ध गोलंदाजी टाकत असताना त्याला दुखापतीमुळे ग्रासले. त्यामुळे तो सामन्याच्या मध्यातूनच माघारी परतला होता. पाक बरोबरच्या सामन्यात भुवनेश्वरने दुखापतीपूर्वी २.४ षटके टाकली. त्यानंतर त्याचे उर्वरीत दोन चेंडू विजय शंकरने टाकले होते. त्याला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात परत मैदानावर येत आले नव्हते. इतकेच नव्हे तर त्याची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे भुवनेश्वर कुमारला किमान ३ सामने मुकावे लागणार असे सांगितले जात होते. भुवनेश्वर कुमारला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही खेळता आले नाही.
दरम्यान, भारताचे या स्पर्धेतील ४ सामने शिल्लक आहेत. यातील पहिला सामना विंडीजशी गुरुवारी होणार आहे. त्यानंतर इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंका या ३ संघांशीही भारताला दोन हात करायचे आहेत.