लंडन : ऑलिम्पिक किंवा विश्वचषकासारख्या कोणत्याही प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा उद्घाटन किंवा समारोप सोहळा म्हणजे लेझर शो, फटाक्यांची आतषबाजी, नामांकित कलाकारांची अदाकारी आणि नवनवीन कलाविष्कारांची मेजवानी किंवा एखाद्या बंदिस्त स्टेडियममध्ये डोळ्यांचे पारणे फेडणारा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नयनरन्य असा सोहळा. पण या समीकरणाला छेद देत मध्य लंडनमधील बंकिंगहॅम पॅलेससमोरील द मॉल येथे संपन्न झालेल्या ‘आयसीसी’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याने मात्र सर्वाची निराशा झाली. रस्त्यावर एखाद्या पथनाटय़ाप्रमाणे झालेल्या या कार्यक्रमाने, ‘विश्वचषकाचा सोहळा असाही असू शकतो का?’ हा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला.
इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्रय़ू फ्लिंटॉफ, हास्यकलाकार पॅडी मॅकगिनिज आणि शिबानी दांडेकर यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. उद्घाटन सोहळ्याआधी १० संघांच्या कर्णधारांनी प्रिन्स हॅरी आणि ब्रिटनच्या राजघराण्यातील कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर सर्व कर्णधारांचे व्यासपीठावर आगमन झाले. यावेळी प्रत्येक कर्णधाराने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अखेरीस लॉरिन आणि रुडीमेंटल यांनी रचलेले ‘स्टँड बाय’ हे विश्वचषकाचे अधिकृत गाणे सादर केले.
चाहत्यांच्या पाठिंब्याने विराट भारावला
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी भारतीय संघाला मिळणारा चाहत्यांचा पाठिंबा पाहून कर्णधार विराट कोहली भारावून गेला. ‘‘इथे येऊन खूप आनंद वाटत आहे. लंडनमध्ये भारताचा अफाट चाहतावर्ग पाहायला मिळत आहे. आमच्यासाठी ही अभिमानाची बाब असली तरी तेवढेच दडपण आमच्यावर आले आहे. येथील चाहत्यांच्या प्रतिसादाचा फायदा उठवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत,’’ असे कोहलीने सांगितले.
६० सेकंदांचे आव्हान
विश्वचषकात भाग घेतलेल्या १० देशांमधील महान खेळाडू आणि त्यांच्या सोबत असलेल्या त्या-त्या देशातील नामांकित व्यक्तींसमोर ६० सेकंदांत चेंडू टोलावण्याचे आव्हान देण्यात आले होते. या कार्यक्रमात सर व्हिव्हियन रिचर्ड्स, जॅक कॅलिस, ब्रेट ली, केव्हिन पीटरसन यांच्यासह नोबेल पुरस्कार विजेती पाकिस्तानची शांतीदूत मलाला युसूफझाई, ऑलिम्पियन योहान ब्लेक यांनी भाग घेतला. भारताकडून माजी कर्णधार अनिल कुंबळे आणि अभिनेता फरहान अख्तर यांनी १९ गुण मिळवले. इंग्लंडने ७४ गुणांची कमाई करत ऑस्ट्रेलियाला मागे टाकले.