विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीत शतकी खेळी करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा शिखर धवन सध्या जायबंदी आहे. फलंदाजीदरम्यान पॅट कमिन्सचा चेंडू शिखरच्या अंगठ्यावर आदळल्यामुळे तो पुढचे काही सामने खेळू शकणार नाहीये. BCCI ने दिलेल्या माहितीनुसार शिखर पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली इंग्लंडमध्येच थांबणार आहे. शिखर जायबंदी झाल्यामुळे त्याच्याऐवजी संघात कोणाला जागा मिळणार या चर्चांनाही उधाण आलेलं आहे. मात्र अशा परिस्थितीमध्येही शिखरने आपल्या मनावर संयम ठेवत, आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक संदेश पोस्ट केला आहे.

प्रख्यात शायर राहत इंदौरी यांच्या ४ ओळी ट्विटर अकाऊंटवर टाकत, मी अजुनही धीर सोडलेला नसल्याचं शिखरने म्हटलंय. दरम्यान शिखरच्या अनुपस्थितीत सलामीच्या जागेसाठी लोकेश राहुलचा पर्याय भारतीय संघाकडे उपलब्ध आहे. मात्र चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी दिनेश कार्तिकला संघात जागा द्यायची का नवीन खेळाडूला स्थान द्यायचं यावर अजुनही चर्चा सुरु आहे.

पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर गुरुवारी न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. यानंतर १६ तारखेला भारत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळेल.

Story img Loader