३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. मात्र भारतीय संघाने आपला पहिला सामना ५ जूनरोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. या सामन्यात भारताने रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर विजयही मिळवला. मात्र इतर सर्व संघाचे किमान दोन सामने झाल्यानंतरही भारतीय संघाचा पहिला सामना न झाल्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनीही, भारतीय संघाच्या विश्वचषक वेळापत्रकावरुन प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
अवश्य वाचा – World Cup 2019 : असाच आत्मविश्वास ठेऊन पुढे वाटचाल करा, सचिनचा भारतीय संघाला सल्ला
एखाद्या स्पर्धेत उशीराने सामना खेळणं याचा पुढील सामन्यांवर परिणाम होऊ शकतो. ३० जूनरोजी भारत यजमान इंग्लंडविरुद्ध सामना खेळणार आहे, त्यानंतर लगेच एक दिवसाच्या विश्रांतीनंतर भारत २ जुलैला बांगलादेशविरुद्ध सामना खेळणार आहे. यादरम्यानच्या काळात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला तर या सर्व प्रश्नांची उत्तर कोणी द्यायची?? असा सवाल गावसकरांनी बीसीसीायला विचारला आहे. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात लिहीलेल्या कॉलममध्ये गावसकरांनी आपलं मत मांडलं आहे.
अवश्य वाचा – जाणून घ्या धोनीच्या ग्लोव्ह्जवरील या चिन्हाचा अर्थ, तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल
दरम्यान, सलामीवीर रोहित शर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने विश्वचषक स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. भारताने आफ्रिकेवर ६ गडी राखून मात केली. २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने नाबाद १२२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. महेंद्रसिंह धोनीच्या सोबतीने रोहितने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
अवश्य वाचा – World Cup 2019 : रोहितची आतापर्यंत सर्वोत्तम खेळी, कर्णधार विराट कोहलीकडून कौतुक