भारतीय वेगवान गोलंदाजीचा कणा म्हणून सध्या जसप्रित बुमराहकडे पाहिले जाते. बुमराहने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत आपली छाप उमटवली आहे. भारताने खेळलेल्या ४ सामन्यात बुमराहने ७ बळी टिपले आहेत. तसेच महत्वाच्या क्षणी भेदक मारा करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. आता भारताचा पुढचा सामना विंडीजच्या संघाशी होणार आहे. पण या सामन्याआधीच ख्रिस गेलला बुमराहच्या यॉर्करची धडकी भरली आहे.

ख्रिस गेल

BCCI ने बुमराहवरील एक छोटीशी डॉक्युमेंट्री ट्विट केली आहे. या मुलाखतीमध्ये ख्रिस गेलने देखील बुमराहबद्दल मत व्यक्त केले आहे. यात बोलताना गेल म्हणाला की बुमराह हा अत्यंत भेदक मारा करून शकतो. तो चेंडू चांगला स्विंग करू शकतो. त्याचा यॉर्कर चेंडूदेखील दमदार असतो. चांगल्या वेगाने गोलंदाजी करतो. जे x फॅक्टर गोलंदाजामध्ये असणे आवश्यक असतात, ते सारे काही बुमराहच्या गोलंदाजीत आहे. त्याची गोलंदाजीची शैली वेगळी आहे. त्याचा त्याला गोलंदाजीत नेहमीच फायदा होता.

पहा Video : …म्हणून यॉर्कर टाकायला मला अधिक आवडतं – बुमराह

याच व्हिडिओत बुमराहने देखील अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यॉर्कर चेंडू अतिशय भेदकपणे कसा टाकता येतो, याचेही त्याने यावेळी उत्तर दिले. “मी लहानपणी अंगणात खेळायचो, तेव्हा मी कायम यॉर्क चेंडू टाकायचो. मला फारसे समजत नसतानाही मी यॉर्कर चंदू टाकण्याचाच सराव करत असायचो. याचे कारण म्हणजे टीव्हीवर मी जेव्हा क्रिकेटचे सामने पाहायचो तेव्हा त्यात एक गोष्ट मला जाणवायची ती म्हणजे गोलंदाजाने यॉर्कर चेंडू टाकला की फलंदाज निरुत्तर होतो आणि गोलंदाजाला यश मिळते. त्यामुळे माझ्या मनात असे समीकरणच तयार झाले की यॉर्कर चेंडू टाकले तरच बळी मिळतो. तेव्हापासून मी यॉर्कर चेंडूचा सराव करतो आहे. म्हणूनच माझं यॉर्कर चेंडूवर अतिशय प्रेम आहे”, असे बुमराहने सांगितले.

Story img Loader