चेन्नई : सलग तीन पराभवांनंतर दडपणाखाली असलेल्या पाकिस्तान संघासमोर एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज, शुक्रवारी लयीत असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान असेल. पाकिस्तानच्या संघाने निराशाजनक कामगिरी करताना पाचपैकी तीन सामने गमावले आहेत. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान शाबूत राखण्यासाठी पाकिस्तानला विजय आवश्यक आहे.

विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमबाबत बरीच चर्चा झाली होती. बाबर या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकेल असे म्हटले जात होते. मात्र, बाबरला फलंदाज आणि कर्णधार या दोनही भूमिकांमध्ये अपयशाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानचा संघ बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरल्यास बाबरचे कर्णधारपद धोक्यात येऊ शकेल. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) प्रसिद्धीपत्रक काढून बाबरला पाठिंबा दर्शवला आहे. परंतु त्याच वेळी ‘विश्वचषकातील कामगिरीच्या आधारे पुढील निर्णय घेतले जातील,’ असेही ‘पीसीबी’च्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील चार सामन्यांत दमदार कामगिरी केली तरच बाबरचे कर्णधारपद वाचण्याची शक्यता आहे.

AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल
Mohammed Rizwan Takes DRS After Consulting With Adam Zampa and Loses Review Watch Video AUS vs PAK 2nd ODI
PAK vs AUS: हा काय प्रकार? मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या सांगण्यावरून घेतला रिव्ह्यू अन् सापडला अडचणीत; पाहा VIDEO
Afro Asia Cup Set to Return After Almost Two Decades India and Pakistan Players Could Play in Same Team
Afro Asia Cup: भारत पाकिस्तानचे खेळाडू दोन दशकांनंतर एकाच संघातून खेळणार? लोकप्रिय क्रिकेट मालिकेबाबत मोठी अपडेट

हेही वाचा >>> IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध सामन्यात अश्विन खेळण्याची शक्यता, रोहित शर्माने काय आखली योजना? जाणून घ्या

पाकिस्तानच्या संघाने यंदाच्या स्पर्धेची सुरुवात नेदरलँड्स आणि श्रीलंकेला नमवत केली होती. मात्र, त्यानंतरच्या तीन सामन्यांत पाकिस्तानला भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या संघांकडून पराभव पत्करावा लागला. आता त्यांच्यासमोर पाचपैकी चार सामने जिंकलेल्या दक्षिण आफ्रिकेला नमवण्याचे आव्हान असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने यंदाच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी आक्रमक खेळ केला असून पाचपैकी चार सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना ३०० हून अधिकची धावसंख्या उभारली आहे. गेले दोन सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळताना आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध ३९९ धावांची, तर बांगलादेशविरुद्ध ३८२ धावांची मजल मारली होती. त्यानंतर प्रतिस्पर्ध्याना २५० हूनही कमी धावांवर रोखत आफ्रिकेने मोठे विजय नोंदवले. आता हीच लय कायम राखण्याचा आफ्रिकेच्या संघाचा प्रयत्न असेल.

’ वेळ : दुपारी २ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २, १ हिंदी, हॉटस्टार अ‍ॅप