एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही (One Day World Cup 2023) आयसीसी स्पर्धेची १३ वी आवृत्ती आहे. २०२३ विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची भारताची चौथी वेळ असेल, तर मेन इन ब्लूने आतापर्यंत दोनदा विजेतेपद पटकावले आहे. २०२३ च्या विश्वचषकाचा (ICC Cricket World Cup 2023)पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि २०१९ चा उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना ५ ऑक्टोबरला होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत यंदा विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असेल. ते ८ ऑक्टोबरला चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करतील. ग्रुप स्टेजमधील वर्ल्ड कप कॅलेंडरमधील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना अगोदर १५ ऑक्टोबरला होणार होता, मात्र नंतर तारखेत बद्दल करत पुन्हा शेड्यूल करण्यात आला. मेन इन ब्लू यांना भारतातील नऊ वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या नऊ प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागणार आहे. ज्यामध्ये चेन्नई, अहमदाबाद, पुणे, मुंबई, बेंगळुरू, धर्मशाला, लखनऊ, कोलकाता आणि दिल्ली यांचा समावेश आहे.