ICC 10 Percent Penalty On Indian Team : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला. आयसीसीने पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाला दंड ठोठावला आहे. टीम इंडियाला मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या पराभवानंतर भारतीय संघाचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील दोन गुणही कमी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियन येथे खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दोन षटके कमी टाकली. यामुळे टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून २ गुण कमी करण्यात आले आहेत. यासोबतच आयसीसीने मॅच फीच्या १० टक्के दंडही ठोठावला आहे. एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनल ऑफ मॅच रेफरी क्रिस ब्रॉडने निर्धारित केलेल्या कालावधीत दोन षटके कमी टाकल्यामुळे भारताला ही शिक्षा ठोठावली आहे.

आयसीसीच्या नियमांनुसार, जर संघ निर्धारित वेळेत ठराविक षटके टाकू शकला नाही, तर तो स्लो ओव्हर रेटचा गुन्हा मानला जातो. अशा स्थितीत खेळाडूंना प्रत्येक षटकासाठी मॅच फीच्या ५ टक्के दंड आकारला जातो. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ षटके कमी टाकली. यामुळे त्याला मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा – IND vs SA : ‘कसोटी सामने जिंकायचे असतील, तर…’, लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया

टीम इंडिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. मॅच फीसह त्याचे २ गुणही कमी झाले आहेत. दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर आहे. तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड तिसऱ्या तर बांगलादेश चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले, तर ते पाचव्या क्रमांकावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc fines india for slow over rate during first world test championship 2025 test against south africa vbm