अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाला आंतराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने(आयसीसी) सहकारी सदस्य होण्यासाठीची मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता अफगाणिस्तानही आयसीसीचा सदस्य संघ होणार आहे. आशिया खंडातून आठवा व संपूर्ण आयसीसी सदस्यांमध्ये अफगाणिस्तान हा ३८वा सभासद असेल.  “इतक्या कमी वेळात अफगाणिस्तान आयसीसीचे सहकारी सदस्यत्व मिळविणारा पहिला देश ठरणार आहे. अफगाणिस्तानने गेल्या काही वर्षात क्रिकेट खेळाला दिलेल्या प्राथमिकतेबद्दल आयसीसीने दखल घेत अफगाणिस्तान क्रिकेट संघाला सहकारी सदस्यत्व दिले आहे.” अशी माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डचे(एसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नूर मुहम्मद यांनी आशियाई क्रिकेट परिषदेच्या संकेतस्थळावर दिली आहे.

Story img Loader