नेपाळ व नेदरलँड्स या देशांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय संघांचा दर्जा दिला आहे. आयसीसीच्या मेलबर्नला झालेल्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात आला.  या दोन देशांबरोबरच अफगाणिस्तान, हाँगकाँग, आर्यलड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनिया, संयुक्त अरब अमिराती या देशांना वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनामुळे ट्वेन्टी२० सामन्यांचाही दर्जा मिळाला आहे. आयसीसीने अमेरिकन क्रिकेट संघटनेला अधिकृत सदस्य म्हणून मान्यता दिली आहे. ओमान देशाच्या संघाला आयसीसीचा ३८वा सहसदस्य म्हणून मान्यता मिळाली आहे. आयसीसीच्या नियमावलींची पूर्तता न केल्यामुळे ब्रुनोई संघाचे सदस्यत्व काढून टाकण्यात आले आहे. आयसीसीच्या सभेत झालेल्या निर्णयानुसार आता ट्वेन्टी-२० सामन्यात २० षटकांसाठी जास्तीतजास्त ८० मिनिटांऐवजी ८५ मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे.

Story img Loader