ICC ODI Ranking: भारताने ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा २-१ने पराभव केला. यानंतर ५ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे, ज्यात टीम इंडिया २-१ने पिछाडीवर आहे. दरम्यान, आयसीसीने एकदिवसीय क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली आहे. नव्या क्रमवारीत वेस्ट इंडिजमधील एकदिवसीय मालिकेत खराब कामगिरी करूनही शुबमन गिलला फारसा तोटा झाल्याचे दिसत नाही. दुसरीकडे, कुलदीप यादवने आपल्या फिरकी गोलंदाजीची जादू दाखवत अव्वल दहामध्ये प्रवेश केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुबमन गिल टॉप ५ मध्ये

शुबमन गिलसाठी वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची वन डेची मालिका फारशी चांगली नव्हती. शुबमनला या मालिकेत फक्त एक अर्धशतक करता आले. खराब फलंदाजीचा त्याच्या क्रमवारीवर (ICC ODI Ranking) परिणाम झाला आहे. त्याने त्याचे स्थान २ क्रमांकांनी गमावले आहे मात्र, तो ५ व्या स्थानावर आहे. बाबर आझम पहिल्या स्थानावर, रासी वेंडर दुसेन दुसऱ्या स्थानावर, फखर जमान तिसऱ्या स्थानावर आणि इमाम-उल-हक चौथ्या स्थानावर आहे.

हेही वाचा: World Cup 2023: “रोहित शर्मा चांगला कर्णधार आहे, पण…” युवराज सिंगने विश्वचषकापूर्वी BCCIकडे केली ‘ही’ मागणी

कुलदीप यादवचा टॉप १० मध्ये प्रवेश

आयसीसीने जाहीर केलेल्या टॉप वन डे गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादवने टॉप १० मध्ये प्रवेश केला आहे. त्याचे ४ क्रमांकाने प्रमोशन झाले असून आता तो १०व्या स्थानावर आहे. कुलदीप यादवने वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३ वन डे सामन्यांच्या मालिकेत एकूण ७ विकेट्स घेतल्या. पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड, दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, तिसऱ्या क्रमांकावर राशिद खान, चौथ्या क्रमांकावर मोहम्मद सिराज आणि पाचव्या क्रमांकावर मॅट हेन्री आहे.

हेही वाचा: WC 2023: घरी बसून नव्हे तर मैदानात विश्वचषकाचे सामने पाहायचे आहेत तर, प्रत्येक चाहत्याने ‘ही’ तारीख लक्षात ठेवलीच पाहिजे

टीम इंडिया कितव्या स्थानावर आहे?

आयसीसीने जाहीर केलेल्या आयसीसी वन डे क्रमवारीत भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड चौथ्या तर इंग्लंड पाचव्या स्थानावर आहे. या पाच संघांपैकी कोणतेही ४ संघ पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचे दावेदार मानले जात आहेत. २०१९ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता ज्यामध्ये इंग्लंड विजेता ठरला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc has announced icc odi ranking kuldeep yadav reaches in top 10 but babar azam at first number and shubman gill is at fifth one avw