ICC has Announced the best Test team for 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०२३ चा सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला आहे. या संघाची धुरा पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी या संघावर वर्चस्व गाजवले आहे. सर्वोत्तम कसोटी संघात भारत आणि इंग्लंडचे प्रत्येकी दोन, श्रीलंका आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी एक खेळाडू आहे. संघात चार फलंदाज, एक यष्टिरक्षक, तीन अष्टपैलू आणि तीन वेगवान गोलंदाज आहेत.
कोहली आणि रोहितच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही दिग्गजांना नव्या कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. या संघातून अनेक दिग्गज खेळाडूंना वगळण्यात आले आहे. कोहलीशिवाय रोहित शर्मालाही संघातून वगळले जाईल यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. जसप्रीत बुमराहलाही संघात स्थान मिळवता आलेले नाही. या संघात भारताच्या रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोघांना स्थान मिळाले आहे.
ओपनिंगची जबाबदारी उस्मान ख्वाजा आणि दिमुथ करुणारत्ने यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर आणि जो रूट चौथ्या क्रमांकावर आहे. संघात ट्रॅव्हिस, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे तीन अष्टपैलू खेळाडू आहेत. त्याचबरोबर कमिन्स, मिचेल स्टार्क आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या रूपाने तीन वेगवान गोलंदाज आहेत. अॅलेक्स कॅरी संघात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून स्थान मिळाले आहे.
हेही वाचा – IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारताची वाढली चिंता, सराव सत्रात श्रेयस अय्यरला झाली दुखापत
या संघात पाकिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा एकही खेळाडू नाही. इंग्लंडचा जो रूट आणि स्टुअर्ट ब्रॉड हे देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत. ब्रॉडने गेल्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. याशिवाय श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांचाही या संघात समावेश आहे.
आयसीसीचा २०२३ मधील सर्वोत्तम कसोटी संघ –
उस्मान ख्वाजा, दिमुख करुणारत्ने, केन विल्यमसन, जो रूट, ट्रॅव्हिस हेड, रवींद्र जडेजा, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, मिचेल स्टार्क, स्टुअर्ट ब्रॉड.