The advantage of Team India’s players in the latest ICC Test rankings: आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. याचा फायदा भारतीय कर्णधार रोहित शर्माला झाला आहे. फलंदाजी क्रमवारीत रोहित दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहित सध्याच्या यादीत सर्वोच्च रँकिंग असलेला भारतीय फलंदाज बनला आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत रविचंद्रन अश्विन आणि गोलंदाजीत रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर कायम आहेत. टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल फलंदाजांच्या क्रमवारीत ७३ व्या क्रमांकावर आहे. यशस्वीचे ४२० रेटिंग गुण आहेत.

कसोटी फलंदाजी क्रमवारीत रोहित टॉप टेनमध्ये दाखल –

आयसीसीच्या ताज्या फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत रोहित दहाव्या क्रमांकावर आला आहे. पहिल्या दहामध्ये तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. यामध्ये न्यूझीलंडचा केन विल्यमसन अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या क्रमांकावर आहे. बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्टीव्ह स्मिथ चौथ्या क्रमांकावर तर मार्नस लबुशेन पाचव्या क्रमांकावर आहे. युवा फलंदाज यशस्वी ७३ व्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत शानदार कामगिरी करताना त्याने शतक झळकावले.

कसोटी गोलंदाजी क्रमवारीत रविचंद्रन अश्विन अव्वल –

रविचंद्रन अश्विन कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याचे ८८४ रेटिंग गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा तिसऱ्या क्रमांकावर आहे. जेम्स अँडरसन चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी पाचव्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – India’s Doping Agency: नाडाचे क्रिकेटपटूंना झुकते माप, २०२१ ते २०२२ दरम्यान फक्त ‘इतक्या’ खेळाडूंची झालीय डोपिंग टेस्ट

कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा अव्वल –

कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर आहे. जडेजाचे ४४९ रेटिंग गुण आहेत. अश्विन अष्टपैलूंच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे ३६२ रेटिंग गुण आहेत. बांगलादेशचा खेळाडू शाकिब अल हसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. बेन स्टोक्स चौथ्या क्रमांकावर आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर आहे. अक्षरचे ३०३ रेटिंग गुण आहेत.

सध्या भारत आणि वेस्ट इंडिज संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने मोठ्या फरकाने जिंकला, ज्याचा फायदा भारतीय संघातील खेळांडून झाला आहे.

Story img Loader