ICC has selected Australia as the best fielding team in World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा हंगाम रविवारी (१९ नोव्हेंबर) रोजी संपन्न झाला. विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून त्यांना जगातील सर्वात धोकादायक संघ का मानले जाते, हे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे. विश्वचषक संपल्यानंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणापासून सर्वोत्कृष्ट फलंदाजी आणि सर्वोत्तम गोलंदाजीपर्यंत सर्व काही जाहीर करण्यात आले आहे. आता आयसीसीने या विश्वचषकात सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघही जाहीर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्या संघाचे सर्वोत्तम क्षेत्ररक्षण होते?

आयसीसीने विश्वचषक संपल्यानंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघ जाहीर केला आहे. इथेही ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. आयसीसीने ऑस्ट्रेलियन संघाचे क्षेत्ररक्षण सर्वोत्कृष्ट असल्याचे वर्णन करून पहिल्या क्रमांकावर ठेवले आहे. आयसीसीने ३८३.५८ गुणांसह ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा संघ ३४०.५९ गुणांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

भारतीय संघ नेदरलँडच्याही मागे –

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण आयसीसीच्या नजरेत नेदरलँड्सनेही भारतीय संघापेक्षा चांगले क्षेत्ररक्षण केले आहे. त्यांनी या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत भारतीय त्रिकूट चौथ्या स्थानावर आहे. भारताला केवळ २८१.०४ गुण मिळाले आहेत, जे ऑस्ट्रेलियापेक्षा १०० गुण कमी आहेत. ऑस्ट्रेलियाला विश्वचषकाचे विजेतेपद का उंचावण्यात आणि संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघाला पराभूत करण्यात का यश आले हे देखील यावरून दिसून येते.

हेही वाचा – World Cup 2023: भारताच्या पराभवाचा आनंद बांगलादेमध्ये साजरा? सोशल मीडियावर VIDEO शेअर करून केला जातोय दावा

अंतिम सामन्याबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजी करायला उतरलेला भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ विकेट गमावत २४१ धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक १३७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या.

हेही वाचा – World Cup 2023 : “हे ​​टाइप करायला मला थोडा…”; ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर बेन स्टोक्सची प्रतिक्रिया

तत्पूर्वी, भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ४७ आणि सूर्यकुमार यादवने १८ धावा केल्या. कुलदीप यादवने १० धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय इतर कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. त्याचबरोबर भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले होते, मात्र ११व्या सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने शेवटचा पराभव २००३ मध्ये केला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc has selected australia as the best fielding team in the 2023 world cup and see the list vbm