Devon Thomas breaching the anti corruption code: गेल्या काही वर्षांत वेस्ट इंडिज क्रिकेट संघाची अवस्था बिकट झाली आहे. दोन वेळा टी-२० विश्वविजेत्याला आता या स्पर्धेची क्वालिफायर फेरी खेळावी लागत आहे. दरम्यान, संघाला आता आणखी एक मोठा डाग लागला आहे. वेस्ट इंडिजचा खेळाडू डेव्हॉन थॉमस (३३) याच्यावर भ्रष्टाचार विरोधी संहिता मोडल्याचा आरोप आहे. येत्या १४ दिवसांत आयसीसीने खेळाडूकडून उत्तर मागवण्यात आले आहे.
डेव्हॉनवर अनेक गंभीर आरोप –
डेव्हॉनवर फिक्सिंगचे गंभीर आरोप आहेत. या खेळाडूवर श्रीलंका प्रीमियर लीग, अबू धाबी टी-१० आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप आहे. त्यामुळे आता श्रीलंका प्रीमियर लीग, क्रिकेट वेस्ट इंडिज आणि एमिरेट्स बोर्डाला त्यांच्या स्तरावर चौकशी करण्यास सांगितले आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजने तपासात पूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
मॅच फिक्सिंगचा आरोप –
डेव्हॉनवर मॅच फिक्सिंगच्या आरोपासह श्रीलंका भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल चार आरोपांचा समावेश आहे. २०२१ मध्ये, लंका प्रीमियर लीगमध्ये कॅंडी वॉरियर्सकडून खेळताना थॉमसने सामना फिक्स करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच फिक्सिंगची माहिती बोर्डाला न दिल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला. अबुधाबी टी-२० मध्ये पुणे डेव्हिल्सकडून खेळताना त्याला फिक्सिंगची ऑफर आली होती, पण त्याने याची माहिती दिली नव्हती.
हेही वाचा – CSK vs GT Qualifier 1: ऋतुराज गायकवाडने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम, गुजरातविरुद्ध केला ‘हा’ खास कारनामा
थॉमसने २०२२ साली वेस्ट इंडिजकडून शेवटचा सामना डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्याच्या कारकिर्दीतील हा एकमेव कसोटी सामना होता. त्याने आतापर्यंत २१ एकदिवसीय आणि १२ टी-२० सामने खेळले आहेत. त्याची नुकतीच आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवड झाली आहे. मात्र, आताची परिस्थिती पाहता त्याला संधी मिळेल, असे वाटत नाही.