Stop Clock Rule in T20 World Cup: आयसीसीने एकदिवसीय आणि टी-२० मध्ये नवीन स्टॉप क्लॉक नियम लागू केला आहे. आयसीसीच्या स्टॉप क्लॉक नियमानुसार, टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक षटक झाल्यानंतर, संघाचा कर्णधार आणि क्षेत्ररक्षक पुढील षटक टाकण्यासाठी अधिक वेळ घेतात. ज्यामुळे सामना वेळेवर संपत नाही. आता सामन्यादरम्यान, एक षटक टाकल्यानंतर पुढचे षटक ६० सेकंदात सुरू झाले नाही, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला दंड म्हणून ५ धावा मिळतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टॉप क्लॉकच्या नवीन नियमानुसार, टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये एक षटक संपल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला दुसरे षटक सुरू करण्यासाठी ६० सेकंदांचा अवधी मिळेल. हा ६० सेकंदाचा वेळ स्क्रीनवर दिसेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्णधाराला या वेळेतच आपल्या गोलंदाजाकडून षटकाची सुरुवात करावी लागेल. तसे करण्यात उशीर झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ५ धावांचा दंड ठोठावण्यात येईल.

टी-२० विश्वचषक २०२४ जूनमध्ये सुरू होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) स्टॉप क्लॉक नियम कायमस्वरूपी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने डिसेंबर २०२३ मध्ये चाचणीच्या आधारावर हा नियम लागू केला.

कोणत्या परिस्थितीत स्टॉप क्लॉक नियम रद्द केला जाऊ शकतो?
जेव्हा एखादा नवीन फलंदाज षटकांच्या दरम्यान विकेटवर येतो.
ऑफिशियल ड्रिंक्सब्रेक दरम्यान.
पंचांनी फलंदाज किंवा क्षेत्ररक्षकाच्या दुखापतीवर ऑनफिल्ड उपचार करण्यास मान्यता दिली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc makes stop clock rule permanent in odi and t20 world cup 2024 know in details bdg