गेल्याच आठवड्यात भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे माध्यम हक्क विकले. तीन दिवस चाललेल्या या ई-लिलावाद्वारे बीसीसीआयला विक्रमी ४८ हजार ३९० कोटी रुपये मिळाले. या माध्यम हक्क विक्री प्रक्रियेची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच चर्चा झाली. बीसीसीआय पाठोपाठ आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनेदेखील माध्यम हक्क विक्रीसाठी निविदा खुल्या केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) २० जूनपासून माध्यम हक्क निविदा विकरण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. या निविदा २०२४ पासून पुढील आठ वर्षांच्या कालावधीमध्ये होणाऱ्या ७११ सामन्यांसाठी असतील. आयसीसी एकूण तीन पॅकेज सादर करणार आहे. या पॅकेजमध्ये महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषकाचाही समावेश आहे. माध्यम हक्कांच्या निविदा विक्रीसाठी आयसीसी पारंपारिक सीलबंद प्रक्रियेचे पालन करणार आहे. याशिवाय, पुरुष आणि महिला सामन्यांसाठी स्वतंत्रपणे बोली आयोजित केली जाणार आहे.

हेही वाचा – IND vs ENG: इंग्लंडमध्ये पोहचताच विराट आणि रोहितने सुरू केली खरेदी! सोशल मीडियावर फोटो व्हायरल

आयसीसीने पुरुष आणि महिलांच्या क्रिकेट सामन्यांसाठी तीन विशेष पॅकेजेस सादर केले आहेत. पॅकेज ए मध्ये टीव्ही प्रसारण हक्क, पॅकेज बी मध्ये डिजिटल हक्क आणि पॅकेज सी मध्ये टीव्ही आणि डिजिटल असे दोन्ही हक्क आहेत. पुरुष गटात चार आणि आठ वर्षांसाठी माध्यम हक्क मिळवता येतील. तर, महिला गटात केवळ चार वर्षांच्या कालावधीसाठी माध्यम हक्क मिळवता येऊ शकतात.

आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “पहिल्यांदाच पुरुष आणि महिला क्रिकेटचे हक्क स्वतंत्रपणे विकले जातील. पुरुष क्रिकेटमधील १६ स्पर्धांसाठी आणि महिला क्रिकेटमधील आठ स्पर्धांसाठी बोली लावता येईल. २०१४ पासून पुढील आठ वर्षांमध्ये दोन्ही गटांमध्ये अनुक्रमे ३६२ आणि १०३ सामने होतील. या ४६५ सामन्यांव्यतिरिक्त, १९ वर्षांखालील पुरुष आणि महिला क्रिकेटचे सामने देखील आहेत. अशा प्रकारे एकूण ७११ सामन्यांसाठी खरेदीदारांना बोली लावता येणार आहे.”

Story img Loader