ENG vs NZ Score, ICC Men’s Cricket World Cup 2023 Highlights: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या १३व्या आवृत्तीला आजपासून सुरुवात झाली. भारतातील १० मैदानांवर होणाऱ्या या स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहेत. गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात गुरुवारी (५ ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला सामना संपन्न झाला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने ५० षटकांत ९ गडी गमावून २८२ धावा केल्या. न्यूझीलंडला विजयासाठी २८३ धावांचे लक्ष्य मिळाले होते. रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे या दोघांनी २७३ धावांची मोठी भागीदारी करत शानदार विजय मिळवून दिला. दोघांनी आपापली अप्रतिम शतके झळकावली आणि नऊ गडी राखून दणदणीत विजय संपादन केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इंग्लंडचे कर्णधारपद जॉस बटलरच्या हाती आहे. २०१९ मध्ये तो खेळाडू म्हणून संघात सामील झाला. त्यानंतर इऑन मॉर्गन इंग्लंडचा कर्णधार होता. त्याचबरोबर केन विल्यमसन न्यूझीलंडची कमान सांभाळत आहे. गेल्या विश्वचषकात त्याने संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, विल्यमसन इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात खेळू शकणार नाही. तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही. विल्यमसनला आयपीएल २०२३च्या पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. विल्यमसनच्या जागी टॉम लॅथम पहिल्या सामन्यात कमान सांभाळेल. इंग्लंड संघाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ५० वा विजय मिळवायचा आहे.
न्यूझीलंडचा मोठा विजय
न्यूझीलंड संघाने १३व्या विश्वचषकाची धमाकेदार सुरुवात केली आहे. त्यांनी गतविजेत्या इंग्लंडचा नऊ गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने विश्वचषक २०१९च्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेतला. त्यानंतर विजेतेपदाच्या सामन्यात सामना आणि सुपर ओव्हर बरोबरीत सुटल्यानंतर इंग्लंडने चौकार मोजण्याच्या नियमानुसार सामना जिंकला.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी (५ ऑक्टोबर) न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने ५० षटकांत नऊ गडी गमावून २८२ धावा केल्या. न्यूझीलंडने ३६.२ षटकात १ विकेट गमावत २८३ धावा करत सामना जिंकला.
इंग्लंडने ५० षटकांत २८२ धावा केल्या
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने ५० षटकांत नऊ गडी गमावून २८२ धावा केल्या. त्याने न्यूझीलंडला २८३ धावांचे लक्ष्य दिले आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने सर्वाधिक ७७ धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला ५० धावांचा टप्पा गाठता आला नाही. कर्णधार जोस बटलरने ४३ धावा केल्या. जॉनी बेअरस्टोने ३३, हॅरी ब्रूकने २५ आणि लियाम लिव्हिंगस्टोनने २० धावांचे योगदान दिले. आदिल रशीदने नाबाद १५, डेव्हिड मलान आणि सॅम कुरनने १४-१४, मार्क वुडने नाबाद १३, मोईन अली आणि ख्रिस वोक्सने ११-११ धावा केल्या.
या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या स्फोटक फलंदाजांना मुक्तपणे खेळू दिले नाही. वेगवान आणि फिरकीच्या मिश्रणाने इंग्लिश संघाला खूप त्रास दिला. वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. फिरकीपटू मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. ट्रेंट बोल्ट आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
ICC Cricket World Cup 2023 England vs New Zealand Highlights Updates: विश्वचषक २०२३ इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हायलाईट्स
गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात गुरुवारी (५ ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला सामना संपन्न झाला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने ५० षटकांत ९ गडी गमावून २८२ धावा केल्या. न्यूझीलंडला विजयासाठी २८३ धावांचे लक्ष्य मिळाले होते. रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे या दोघांनी २७३ धावांची मोठी भागीदारी करत शानदार विजय मिळवून दिला. दोघांनी आपापली अप्रतिम शतके झळकावली.
रचिन रवींद्रने आपल्या कारकीर्दीतील पहिले शतक पूर्ण केले आहे. विश्वचषक आणि वन डेमधले हे त्याचे पहिले शतक आहे. कॉनवे आणि रचिन यांच्या शतकांमुळे न्यूझीलंडने स्वत:ला चांगल्या स्थितीत आणले आहे. माजी विश्वविजेते सध्या पराभवाच्या छायेत दिसत आहेत.
न्यूझीलंड २२६-१
HUNDRED FOR RACHIN RAVINDRA…!!!
— Johns. (@CricCrazyJohns) October 5, 2023
He is just 23-year-old, playing his 9th innings in ODI, on his World Cup debut, he smashed hundred from just 82 balls against Defending Champions England. pic.twitter.com/9EmLOITvER
इंग्लंडने ठेवलेल्या २८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला सलामीवीर डेव्हॉन कॉनवेचे तुफानी शतक झळकावत २०१९च्या विश्वचषक फायनलचा बदला घेतला आहे. सध्या इंग्लंडचा पूर्णपणे पराभवाच्या छायेत दिसत आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघ ड्रायव्हिंग सीटवर असून पहिल्या विजयाच्या दिशेने कूच करत आहे. रचिन रवींद्र देखील ९५ धावांवर खेळत आहे.
न्यूझीलंड २०५-१
The story of Devon Conway is quite inspirational!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 5, 2023
He moved to New Zealand in hopes of pursuing his career in things he loved to do. Today the 32 year old became the first centurion of the 2023 World Cup, that too on his World Cup debut. pic.twitter.com/EYauIFOMdf
यंग विल बाद होताच न्यूझीलंडने इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत शानदार फटकेबाजी केली. रचिन रवींद्रने तुफानी अर्धशतक झळकावत ३६ चेंडूत ५३ धावांवर खेळत आहे. त्याच्या खेळीने न्यूझीलंडच्या १०० धावा देखील पूर्ण झाल्या आहेत. दुसऱ्या बाजूला कॉनवे ४५ धावांवर रवींद्र चांगली साथ देत आहे. त्यांच्यात ६६ चेंडूत ९० धावांची भागीदारी झाली आहे.
न्यूझीलंड १००-१
दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. इंग्लंडचे दुसरे षटक टाकण्यासाठी सॅम करन आला. त्याने पहिल्याच चेंडूवर विल यंगला बाद केले. यंग खातेही खेळू शकला नाही आणि यष्टिरक्षक जोस बटलरकडे झेलबाद झाला.
न्यूझीलंड १०-१
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या १३व्या आवृत्तीला आजपासून सुरुवात झाली. भारतातील १० मैदानांवर होणाऱ्या या स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहेत. गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात गुरुवारी (५ ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला सामना होणार आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने ५० षटकांत ९ गडी गमावून २८२ धावा केल्या. न्यूझीलंडला विजयासाठी २८३ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
We've completed our innings and have set New Zealand 2️⃣8️⃣3️⃣ to win.
— England Cricket (@englandcricket) October 5, 2023
? Narendra Modi Stadium#EnglandCricket | #CWC23 pic.twitter.com/9DX5jjQpDD
ग्लेन फिलिप्सच्या शानदार फिरकी गोलंदाजीपुढे इंग्लंडने नांगी टाकली आहे. एकाबाजूने विकेट्स पडत असताना स्टार फलंदाज जो रूटने दुसरी बाजू सांभाळून धरली होती. मात्र, फिलिप्सच्या दुसऱ्या षटकात जो रूटने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला आणि क्लीन बोल्ड झाला. रूटने ८६ चेंडूत ७७ धावा केल्या.
इंग्लंड २३८-७
ट्रेंट बोल्टने लियाम लिव्हिंगस्टोनला बाद करून न्यूझीलंडला सहावे यश मिळवून दिले. लिव्हिंगस्टोनने २२ चेंडूत २० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार मारले. मॅट हेन्रीने लिव्हिंगस्टोनचा झेल घेतला. इंग्लंडने ४० षटकात ६ बाद २२४ धावा केल्या आहेत. जो रूट नाबाद ७४ आणि सॅम करनने एक धाव केली आहे.
मॅट हेन्रीने न्यूझीलंडला सामन्यातील पाचवे यश मिळवून दिले. त्याने ३४व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला बाद केले. बटलर ४२ चेंडूत ४३ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. बटलरने जो रूटसोबत पाचव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. बटलरला टॉम लॅथमने विकेटच्या मागे झेलबाद केले. इंग्लंडने ३३.२ षटकात ५ विकेट्स गमावत १८८ धावा केल्या आहेत. जो रूट ५९ धावा करून नाबाद आहे.
इंग्लंड १९१-५
सध्याच्या विश्वचषक स्पर्धेतील पहिले अर्धशतक इंग्लंडचा अनुभवी खेळाडू जो रूटने झळकावले. रूटने ३०व्या षटकात ५० धावांचा टप्पा ओलांडला. इंग्लंडने ३० षटकांत चार विकेट गमावत १६६ धावा केल्या आहेत. जो रूट ५० आणि जोस बटलर ३० धावांवर नाबाद आहे.
इंग्लंड १७९-४
ग्लेन फिलिप्सने न्यूझीलंडला चौथे यश मिळवून दिले. २२व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने मोईन अलीला क्लीन बोल्ड केले. मोईनने १७ चेंडूत ११ धावा केल्या. इंग्लंडने २२ षटकात ४
विकेट्स गमावत १२१ धावा केल्या आहेत. जो रूट नाबाद ३३ तर कर्णधार जोस बटलर दोन धावांवर नाबाद आहे.
इंग्लंड १६३-४
रचिन रवींद्रने न्यूझीलंडला तिसरे यश मिळवून दिले. हॅरी ब्रूकने आपल्या पहिल्या आणि डावाच्या १७व्या षटकात धावा केल्या. ब्रूकने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारले. त्याने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर सहाव्या चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवण्याच्या प्रयत्नात डेव्हॉन कॉनवे सीमारेषेवर झेलबाद झाला. त्याने १६ चेंडूत २५ धावा केल्या.
इंग्लंड ११२-३
इंग्लंड संघाला दुसरा धक्का १३व्या षटकातील पाचव्या चेंडूवर बसला. मिचेल सँटनरने सलामीवीर जॉनी बेअरस्टोला बाद केले. बेअरस्टो ३५ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. सॅंटनरच्या चेंडूवर तो डॅरिल मिशेलकरवी झेलबाद झाला. इंग्लंडने १३ षटकांत दोन गडी गमावून ६४ धावा केल्या आहेत. जो रूट १५ धावा करून नाबाद आहे. हॅरी ब्रूकचे खाते अद्याप उघडलेले नाही.
इंग्लंड ७३-२
चांगल्या सुरुवातीनंतर इंग्लंडला पहिला धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा घातक गोलंदाज मॅट हेन्रीने भेदक गोलंदाजी करत डेव्हिड मलानला टॉम लॅथमकरवी झेलबाद केले. त्याने २४ चेंडूत १४ धावा केल्या.
इंग्लंड ४६-१
इंग्लंडची सुरुवात संथ झाली. पहिल्या षटकात १२ धावा काढल्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड मलान वेगवान धावा काढू शकले नाहीत. इंग्लंडने पहिल्या सहा षटकात एकही बिनबाद 35 धावा केल्या आहेत. जॉनी बेअरस्टो २१ तर मलान १३ धावांवर नाबाद आहे.
इंग्लंड ३५-०
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने वेगवान सुरुवात केली आहे. जॉनी बेअरस्टोने ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात एक षटकार आणि एक चौकार ठोकला. इंग्लंडने एका षटकात कोणतेही नुकसान न करता १२ धावा केल्या आहेत. जॉनी बेअरस्टोने ११ आणि डेव्हिड मलानने १ धावा केल्या आहेत.
इंग्लंड १५-०
न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार, विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट.
इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार, विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.
Locked & Loaded! ????
— Star Sports (@StarSportsIndia) October 5, 2023
The wait is over, as England & New Zealand name their playing XI for the curtain raiser of #CWC2023! ?
Tune-in to #ENGvNZ in WorldCupOnStar
LIVE NOW | Star Sports Network + Disney & Hotstar#Cricket pic.twitter.com/WjzP3trgaB
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा कार्यवाहक कर्णधार टॉम लॅथमने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकली आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन या सामन्यात खेळत नाहीये. लॉकी फर्ग्युसनही दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच वेळी, बेन स्टोक्स इंग्लंडच्या प्लेइंग-११ मध्ये नाही.
New Zealand have won the Toss and elected to field 1st #ENGvsNZ #CWC23 pic.twitter.com/AlLNdFtgMp
— I B R A R ??? (@immuhammadibrar) October 5, 2023
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये लाल आणि काळ्या मातीच्या स्वतंत्र खेळपट्ट्या आहेत. दोन्ही प्रकारच्या मातीच्या मिश्रणातून तयार केलेली खेळपट्टीही आहे. लाल मातीने बनवलेल्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते, तर काळ्या मातीची खेळपट्टी थोडी संथ असते जी फिरकीपटूंसाठी चांगली असते. हा सामना कोणत्या खेळपट्टीवर खेळवला जाणार हे सध्या स्पष्ट झालेले नाही. दोन्ही प्रकारच्या मातीपासून बनवलेल्या खेळपट्ट्यांवर हा सामना खेळवला जाण्याची शक्यता आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की आयपीएल २०२३च्या फायनलमध्ये येथील खेळपट्टीवर खूप धावा झाल्या होत्या. ३५ षटकात एकूण ३८५ धावा झाल्या.
खेळपट्टी कोणतीही असो, रात्री गोलंदाजी करणाऱ्या संघाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण रात्री येथे दव पडत आहेत. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप २०२३चा सलामीचा सामना आज दुपारी २ वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू होईल. या शहरात पावसाळा संपला असून आज हवामान पूर्णपणे निरभ्र होणार आहे. म्हणजेच पावसामुळे सामन्यात कोणताही अडथळा येणार नाही. आज येथे हवामान उष्ण असणार आहे. तापमान ३६ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पाऊस रात्री पडू शकतो. गेल्या काही दिवसांपासून येथे रात्रीच्या वेळी सातत्याने गारपीट होत आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 95 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत दोन्ही संघांनी ४४-४४ सामने जिंकले आहेत. तीन सामने टाय झाले आहेत. चार सामन्यांचा निकाल जाहीर झालेला नाही. विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर दोघांमधील हा ११वा सामना असेल. न्यूझीलंडने पाच सामने जिंकले असून चारमध्ये इंग्लंडला यश आले आहे. एक सामना बरोबरीत आहे.
विश्वचषकाचे सामने भारतातील १० शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे स्पर्धा आहेत. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने आयोजित केली जाईल. १० पैकी अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. मागच्या वेळी इंग्लंडमध्ये याच फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर इंग्लिश संघाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला गुरुवारी (५ ऑक्टोबर) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. २०१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्यानंतर सामना टाय झाला आणि सुपर ओव्हर झाली. चौकार मोजण्याच्या नियमांच्या आधारे इंग्लंडला चॅम्पियन घोषित करण्यात आले. न्यूझीलंड संघाला त्या सामन्यातील पराभवाचा बदला घ्यायचा आहे. दुसरीकडे, जेतेपदाचा दावेदार जोस बटलरचा संघ विजयी सुरुवात करू इच्छितो. बहुतेक स्पर्धांमध्ये, पहिला सामना मागील आवृत्तीत अंतिम सामना खेळलेल्या दोन संघांमध्ये असतो. त्यामुळे पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात ठेवण्यात आला आहे.
A rematch of the 2019 Final kicks things off at #CWC23 ?
— ICC (@ICC) October 5, 2023
Who's your pick to win the opener? ? pic.twitter.com/lRJau3MbUJ

२०१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्यानंतर सामना टाय झाला आणि सुपर ओव्हर झाली. चौकार मोजण्याच्या नियमांच्या आधारे इंग्लंडला चॅम्पियन घोषित करण्यात आले. न्यूझीलंड संघाला त्या सामन्यातील पराभवाचा बदला घ्यायचा आहे.