आयसीसीने वनडेमधील फलंदाजांची ताजी रॅकिंग जाहीर केली आहे. या रॅकिंगमध्ये टॉप-५ फलंदाजांमध्ये भारताच्या ३ फलंदाजांचा समावेश आहे. पण यापैकी एक नाव असं आहे जे फारच कमी जणांच्या परिचयाचं असेल, तो म्हणजे हॅरी टेक्टर. आयर्लंड क्रिकेट संघाचा हॅरी टेक्टर हा सहयोगी राष्ट्रांमधील फलंदाजी करताना पाहण्याजोगा खेळाडूंपैकी एक आहे. या फलंदाजाकडे चेंडूला वेळ देत नेत्रदीपक शॉट्स खेळण्याचे कौशल्य आहे. गेल्या काही वर्षांत त्याची क्रिकेटमधील प्रगती उल्लेखनीय आहे.

ICC ने नुकत्याच जाहीर झालेल्या पुरुषांच्या एकदिवसीय क्रमवारीत टेक्टर (७६७)हा भारताचा तडाखेबंद फलंदाज विराट कोहली (७६८) पेक्षा फक्त एक रेटिंग पॉइंटने मागे आहे. इतकेच नव्हे तर हा आयरिश संघाचा मधल्या फळीतील फलंदाज भारतीय कर्णधार रोहित शर्मा (७४६) पेक्षा २१ रेटिंग गुणांनी पुढे आहे. पाकिस्तानचा बाबर आझम क्रमवारीत अव्वल स्थानी आणि शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

टेक्टरने ४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९.९१ च्या सरासरीने १७४७ धावा केल्या आहेत. २०२२, २०२३ आणि २०२४ (आतापर्यंत) ही वर्षे त्यांच्यासाठी फारच चांगली ठरली. २०२२ मध्ये टेक्टरने ७६.०८० च्या सरासरीने ३८४ धावा, २०२३ मध्ये त्याने ५०.९ च्या सरासरीने ७११ धावा तर २०२४ मध्ये आतापर्यंत ७०.५० च्या सरासरीने १४१ धावा केल्या आहेत.

आयसीसी एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी
१. बाबर आझम – पाकिस्तान – ८२४
२. शुभमन गिल – भारत – ८०१
३. विराट कोहली – भारत – ७६८
४. हॅरी टेक्टर – आयर्लंड – ७६७
५. रोहित शर्मा – भारत – ७४६

कसोटी क्रमवारी
भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने १००व्या कसोटी सामन्यात नऊ विकेट्स घेत कसोटी गोलंदाजांच्या यादीत पुन्हा अव्वल स्थान मिळवले. तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कसोटीमधील ताज्या फलंदाजीच्या क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर परतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या धरमशाला कसोटीत अश्विनने सर्वोत्तम कामगिरी करत पहिल्या डावात चार विकेट घेतले आणि त्यानंतर दुसऱ्या डावात ३६व्यांदा पाच विकेट घेत भारताला पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.

Story img Loader