ICC ODI Rankings: पाकिस्तान क्रिकेट संघ आणि त्यांचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासाठी ही लाजिरवाणी परिस्थिती बनली, कारण अवघ्या ४८ तासांत पाकिस्तानचे एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन पद गेले असून ते तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. आयसीसीने त्यांच्या आनंदावर विरजण पाडल्याचे दिसत आहे. ५ मे रोजी मध्यरात्री, भारत आणि ऑस्ट्रेलियाला मागे टाकून पाकिस्तान आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत प्रथमच पहिल्या क्रमांकाचा संघ बनला. यावर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट करून संघाचे कौतुक केले, त्यानंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये जल्लोषाचे वातावरण तयार झाले होते.
‘चार दिन की चांदनी फिर अंधेरी रात.’ या वाक्यप्रचारानुसार सध्यातरी ही गोष्ट पाकिस्तान क्रिकेट संघाला शोभणारी आहे. खरेतर, पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने दोन दिवसांतच एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर वनचा मुकुट गमावला. रविवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला ४७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर घसरला आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा किंग बनला.
मात्र, ४८ तासांच्या आत म्हणजेच ७ मे रोजी भारतीय क्रिकेट संघ एकही सामना न खेळता आहे त्या स्थानी पोहोचला, तर पाकिस्तानबाबतही असेच घडले. खरेतर, न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील चौथ्या सामन्यात पाकिस्तान संघाने न्यूझीलंडचा १०२ धावांनी पराभव केला. या विजयानंतर बाबर आझमचा संघ नंबर वन झाला. त्यानंतर भारतीय संघ तिसर्या क्रमांकावर घसरला होता आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये आनंद साजरा झाला होता. मात्र, या मालिकेनंतर पाकिस्तानच्या क्रमवारीत नक्कीच सुधारणा झाली आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान १०६ गुणांसह क्रमवारीत पाचव्या स्थानावर होता. न्यूझीलंडचा १-४ असा पराभव केल्यानंतर पाकिस्तानचे ११२ गुण झाले आहेत. पुढील एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानला पुन्हा अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे.
हेही वाचा: ब्रिजभूषण यांना २१ मेपर्यंत अटक करा!, समितीच्या सल्ल्यानंतर आंदोलक कुस्तीगिरांची मागणी
यासाठी पहिले स्थान महत्त्वाचे आहे
पाकिस्तानच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा वन डे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया ११३ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला सध्या एकही एकदिवसीय मालिका खेळायची नसल्याने प्रथम क्रमांकाचा मुकुट मिळवण्याची संधी मिळणार नाही. न्यूझीलंड पाचव्या स्थानावर कायम आहे परंतु आता त्यांचे रेटिंग १०७ वरून १०८ पर्यंत सुधारले आहे. ते १११ गुणांसह चौथ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या मागे आहेत. या वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने ही क्रमवारी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जो संघ क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असेल, तो अधिक आत्मविश्वास आणि उत्साहाने विश्वचषकात प्रवेश करेल.