ICC ODI Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने ‌नुकतीच नवी क्रमवारी जाहीर केली. खेळाडूंच्या वैयक्तिक क्रमवारीत अनेक खेळाडूंना त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे प्रमोशन झाल्याचे दिसत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान झालेल्या वन डे मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला मिळाले. मालिकेत सर्वाधिक बळी मिळवणारा सिराज या नव्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दोन शतकांसह २८३ धावा करणाऱ्या विराट कोहलीने ताज्या आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत चार स्थानांची प्रगती केली आहे. आठव्या स्थानावरून तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गोलंदाजी क्रमवारीत मोहम्मद सिराजला १५ स्थानांचा फायदा झाला आहे. गोलंदाजी क्रमवारीत तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

कोहली बाबरच्या जवळ पोहोचला

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम (८८७) अव्वल स्थानावर आहे. येथे दुसरा आणि तिसरा क्रमांक प्रोटीज फलंदाजांनी व्यापला आहे. रासी व्हॅन डर डुसेन (७६६) दुसऱ्या क्रमांकावर आणि क्विंटन डिकॉक (७५९) तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली (७५०) चौथ्या स्थानावर आहे. यानंतर टॉप-१० मध्ये डेव्हिड वॉर्नर (७४७), इमाम-उल-हक (७४०), केन विलियम्सन (७२१), स्टीव्ह स्मिथ (७१९), जॉनी बेअरस्टो (७१०) आणि रोहित शर्मा (७०४) यांचा समावेश आहे.

हेही वाचा: IND vs NZ 1st ODI: टॉम लॅथमच्या ग्लोव्हजनी घेतली हार्दिक पांड्याची विकेट? मैदानावर सगळेच होते संभ्रमात, पण थर्ड अंपायर वादाच्या भोवऱ्यात!

शुबमन गिललाही फलंदाजी क्रमवारीत १० स्थानांचा फायदा झाला आहे. या फलंदाजाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये २०० हून अधिक धावा केल्या होत्या. तो आता २६व्या क्रमांकावर आला आहे.

सिराजची क्रमवारीत मोठी झेप

मोहम्मद सिराजने श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ९ विकेट्स घेतल्या होत्या. या काळात त्याचा इकॉनॉमी रेटही उत्कृष्ट होता. याचा फायदा म्हणजे तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग गुणांसह (६८५) तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हा २८ वर्षीय गोलंदाज यापूर्वी १८व्या क्रमांकावर होता.

हेही वाचा: IND vs NZ 1st ODI: याला म्हणतात गोलंदाजी! न्यूझीलंडच्या फिरकीसमोर मागच्या सामन्यातील शतकवीर किंग कोहलीच्या दांड्या गुल

गोलंदाजांमध्ये ट्रेंट बोल्ट (७३०) पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा जोस हेझलवूड (७२७) दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद सिराज (६८५) तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी मिचेल स्टार्क (६६५) चौथ्या स्थानावर आहे. रशीद खान (६५९), अॅडम झम्पा (६५५), शाकीब अल हसन (६५२), मॅट हेन्री (६४३) आणि शाहीन आफ्रिदी (६४१) हे टॉप-१० गोलंदाजांमध्ये आहेत. भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवच्या गोलंदाजीच्या क्रमवारीतही बरीच सुधारणा झाली आहे. कुलदीपने ७ स्थानांनी झेप घेत २१ वा क्रमांक पटकावला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc odi rankings rohit sharmas favorite mohammad siraj promoted in icc rankings virat in top 4 avw