ICC ODI Ranking: ताज्या आयसीसी क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी मोठी प्रगती केली आहे. टीम इंडियाने आशिया चषक २०२३ मध्ये चमकदार कामगिरी केली असून या कालावधीत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. आशिया कपमध्ये दोन अर्धशतकांसह १५४ धावा करणारा शुबमन गिल त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आगामी काळात तो एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर येऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अव्वल स्थानावर असलेल्या बाबर आझमचे ८६३ गुण आहेत, तर गिल ७५९ रेटिंगसह १०३ गुणांनी मागे आहे. शुबमन व्यतिरिक्त, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही प्रत्येकी दोन स्थानांचा फायदा झाला आहे. दोन्ही दिग्गज पहिल्या १० फलंदाजांमध्ये सामील झाले आहेत. कोहली ८व्या आणि रोहित ९व्या स्थानावर आहे. तब्बल साडेचार वर्षांनंतर प्रथमच भारताच्या तीन फलंदाजांना आयसीसी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे. यापूर्वी जानेवारी २०१९ मध्ये भारताचा शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली पहिल्या १० मध्ये होते. भारताबरोबरचं सध्या अव्वल १० फलंदाजांमध्ये पाकिस्तानचेही तीन खेळाडू आहेत. त्यात इमाम-उल-हक एका स्थानाने घसरण होऊन तो ५व्या स्थानावर तर फखर जमान तीन स्थानांनी घसरून १०व्या स्थानावर आला आहे.

भारताचा अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादवनेही एकदिवसीय क्रमवारीत प्रगती केली आहे. आशिया चषक स्पर्धेत त्याने नऊ विकेट्स घेतल्याने त्याचे पाच स्थानांनी प्रमोशन झाले आहे, सध्या तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हार्दिक पांड्या चार स्थानांनी सुधारून ६व्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ आठ स्थानांनी २१व्या स्थानावर तर नसीम शाह ११ स्थानांनी प्रगती करत ५१व्या स्थानावर पोहोचला आहे.

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात तीन विकेट घेत एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज १० स्थानांनी २५व्या तर तबरेझ शम्सी १५ स्थानांनी झेप घेत २९व्या स्थानावर पोहोचला आहे. फलंदाजांमध्ये टेंबा बावुमाने २१ स्थानांची प्रगती करत ११व्या स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डेव्हिड वॉर्नरने एका स्थानाची प्रगती करत चौथे स्थान पटकावले आहे. दुसरीकडे ट्रॅव्हिस हेडने सहा स्थानांनी प्रगती करत याच यादीत २०वे स्थान मिळविले आहे.

हेही वाचा: NZ ODI WC 2023 Squad: आई, बायको, मुलं, आजी- न्यूझीलंडच्या वर्ल्डकप संघाची अनोखी घोषणा; Video व्हायरल

न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत तीन स्थानांनी प्रगती करत ११व्या स्थान पटकावले. तर टीम सेफर्टने ३२ स्थानांनी प्रगती करत २१व्या स्थानावर आणि मार्क चॅपमनने सहा स्थानांनी प्रगती करत २३व्या स्थानावर पोहोचले आहे. गोलंदाजांमध्ये मिचेल सँटनर चार स्थानांनी १५व्या तर ईश सोधीने चार स्थानांनी प्रगती करत १६व्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडचा अनुभवी जॉनी बेअरस्टो ३१ स्थानांच्या सुधारणासह फलंदाजांच्या यादीत ३०व्या स्थानावर आहे.