ICC ODI Ranking, Shubman Gill and Mohammad Siraj: पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमची राजवट संपवत भारतीय स्टार शुबमन गिल आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मोहिमेची जोरदार सुरुवात करताना शुबमन गिलने बाबरला मागे टाकले आणि या यादीत तो सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्यानंतर प्रथम क्रमांक मिळवणारा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२३च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. संघातील सर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून महत्त्वाचे योगदान देत आहेत. सलग आठ सामने जिंकून टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली आहे. आता त्यात आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाज आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला मागे टाकले आहे.

प्रिन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुबमन गिलने गेल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध ९२ आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २३ धावांचे योगदान दिले आहे आणि या स्पर्धेत सहा डावांत एकूण २१९ धावा केल्या आहेत. बाबरने विश्वचषकात आठ डावांत एकूण २८२ धावा केल्या असून गिलच्या सहा रेटिंग गुणांनी तो दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. जगातील पहिल्या क्रमांकाचा एकदिवसीय फलंदाज म्हणून बाबर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ त्या ठिकाणी होता. त्याला मागे टाकत शुबमनने मोठी कामगिरी केली आहे. त्याचबरोबर भारताच्या मोहम्मद सिराजने पुन्हा एकदा वन डे गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीला मागे टाकत त्याने गोलंदाजी क्रमवारीत पहिले स्थान मिळवले.

विराट आणि श्रेयसच्या क्रमवारीतही सुधारणा

शुबमन गिल व्यतिरिक्त शानदार फॉर्मात असलेल्या विराट कोहलीच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. त्याने तीन स्थानांची झेप घेतली असून तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोहलीचा रेटिंग पॉइंट तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या क्विंटन डी कॉकपेक्षा एक पॉइंटने कमी आहे. या विश्वचषकात विराटने आतापर्यंत ५४३ धावा केल्या आहेत. फलंदाज आणि गोलंदाजांच्या सर्वोत्तम १० क्रमवारीत अनेक बदल झाले आहेत.

हेही वाचा: AUS vs AFG: “हे फक्त तूच…”, ग्लेन मॅक्सवेलच्या तुफानी द्विशतकी खेळीवर विराट कोहलीचे सूचक विधान

एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत श्रेयस अय्यरने १७ स्थानांची झेप घेत १८व्या स्थानावर पोहोचले आहे. पाकिस्तानच्या फखर जमानने न्यूझीलंडविरुद्ध शानदार खेळी केल्याने त्याच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. तीन स्थानांच्या सुधारणासह फखर ११व्या स्थानावर पोहोचला आहे. अफगाणिस्तानच्या इब्राहिम जादरानने मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले. त्याच्या क्रमवारीत सहा स्थानांची सुधारणा झाली. एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत तो १२व्या स्थानावर पोहोचला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc odi rankings shubman gill overtakes babar azam and occupies first place siraj snatches the reign from shaheen avw
Show comments