Shubman Gill No.1 ODI Batter in ICC ODI Rankings: बहुप्रतिक्षित आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात झाली आहे. पहिलाच सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जात असून धावा करण्यासाठी किवी संघ मोठे प्रयत्न करत आहे. पण या सामन्यापूर्वीच आयसीसीने वनडे क्रमवारीत बाबर आझमला धक्का दिला. बाबर आझमने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान गमावले आहे. तर भारताचा सलामीवीर शुबमन गिल याने पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयसीसीने नवीन एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. आता शुबमन गिल वनडेमधील नंबर वन फलंदाज बनला आहे. त्याचे रेटिंग आता ७९६ पर्यंत वाढलं आहे. याआधी शुबमन गिल २०२३ मध्येही काही काळ अव्वल फलंदाज ठरला होता. पण नंतर बाबर आझमने पुन्हा ताबा मिळवला. प्रदीर्घ काळानंतर बाबर आझमला पुन्हा एकदा आपले स्थान गमवावे लागले आहे.

दरम्यान, बाबर आझम आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग ७७३ आहे. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या स्थानांमध्ये फारसा फरक नाही, त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान आणखी काही बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. त्याचे रेटिंग सध्या ७६१ आहे. दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेननेही एका स्थानाची झेप घेतली आहे. तो आता ७५६ रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेललाही दोन स्थानांचा फायदा झाला आहे. तो ७४० च्या रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर पोहोचण्यात यशस्वी झाला आहे.

विराट कोहली ७२७ रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर कायम आहे. आयर्लंडचा युवा खेळाडू हॅरी टॅक्टर याला यावेळी तीन स्थानांनी घसरला आहे. तो आता ७१३ च्या रेटिंगसह सातव्या क्रमांकावर घसरला आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या चारिथ असलंकाने मोठी उडी मारली आहे. तो आता आठव्या स्थानी पोहोचला आहे. त्याचे रेटिंग थेट ६९४ पर्यंत वाढले आहे. भारताच्या श्रेयस अय्यरलाही दोन स्थानांचा फायदा झाला आहे. तो ६७९ रेटिंगसह नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजच्या शे होपची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. त्याचे रेटिंग ६७२ असून तो दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

शुभमन गिलने २०१९ मध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत या खेळाडूने केवळ ५० एकदिवसीय सामने खेळले आहेत. पण त्याने यादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करत मोठ्या धावा केल्या. गिलने ६० पेक्षा जास्त सरासरीने २५८७ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने ७ शतकं आणि १५ अर्धशतकं केली आहेत. गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्येही द्विशतक झळकावले आहे. गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५०० धावा करणारा जगातील पहिला खेळाडू आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc odi rankings shubman gill overtakes babar azam to become no 1 batter in the world ahead of champions trophy bdg