ICC ODI Ranking 3 India Players in Top-5: चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील आतापर्यंत सर्वच सामन्यांमध्ये शतकं झालेली पाहायला मिळाली. एकदिवसीय सामन्यांमुळे यावेळी क्रमवारीत बरेच बदल पाहायला मिळत आहेत. या क्रमवारीचा भारतीय खेळाडूंना चांगलाच फायदा झाला आहे. विराट कोहलीने शतकी खेळीनंतर क्रमवारीत झेप घेतली आहे.

एकीकडे शुबमन गिलने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत पहिलं स्थान गाठलं होतं, जे त्याने कायम ठेवत आपली आघाडी अधिक भक्कम केली आहे. तर दुसरीकडे विराट कोहलीनेही झेप घेतली आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने शानदार शतक झळकावले होते, त्याचा फायदा त्याला झालेला दिसून आला.

आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीत शुबमन गिल पहिल्या क्रमांकावर आहे. यावेळी त्याचे रेटिंग ८१७ पर्यंत वाढले आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या गिलने यापूर्वी २०२३ मध्ये ८४७ रेटिंग गुणांपर्यंत मोठी मजल मारली होती. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. त्याचे रेटिंग ७७० गुण आहे. याचाच अर्थ पहिल्या आणि दुसऱ्या स्थानांमधील रेटिंगमधील अंतर लक्षणीयरीत्या वाढले आहे, जे बाबर आझमला गाठणं सोप असणार नाही.

रोहित शर्मा वनडे रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अजूनही तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. त्याचे रेटिंग ७५७ आहे. मात्र, गेल्या दोन डावांत त्याच्या बॅटमधून फारशा धावा झाल्या नाहीत. दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला हेनरिक क्लासेनब ७४९ रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, भारताच्या विराट कोहलीने एका स्थानाने झेप घेतली आहे. तो आता ७४३ च्या रेटिंगसह ५व्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १११ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी केली.

ICC ODI Rankings in Champions Trophy
चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान जाहीर झाली ताजी वनडे रँकिंग

दरम्यान, न्यूझीलंडच्या डॅरिल मि;sलला एका स्थानाचा धक्का बसला. तो आता ७१७ च्या रेटिंगसह ६व्या क्रमांकावर गेला आहे. आयर्लंडच्या हॅरी टॅक्टरने ७१३ रेटिंगसह ७व्या क्रमांकावर आपले स्थान कायम राखले आहे. श्रीलंकेचा चारिथ असलंका ६९४ रेटिंगसह ८व्या क्रमांकावर आहे. भारताचा श्रेयस अय्यर ६७९ रेटिंगसह ९व्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजचा शे होप ६७२ रेटिंगसह १०व्या क्रमांकावर आहे.

Story img Loader