भारताने विंडीजवर वन-डे मालिकेत ३-१ ने मात करत पुन्हा एकदा घरच्या मैदानावर आपण अव्वल असल्याचं दाखवून दिलं. मात्र भारताच्या या कामगिरीचा विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल यांना फायदा झाला आहे. विराट आणि जसप्रीत यांनी अनुक्रमे फलंदाजी व गोलंदाजीत आपलं अव्वल स्थान कायम राकलं असून, युझवेंद्र चहलने गोलंदाजीत सर्वोत्तम १० जणांमध्ये प्रवेश मिळवला आहे. सध्या चहल आठव्या स्थानावर पोहचला आहे. विराट आणि रोहित यांनी विंडीजविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली, त्यामुळे हे दोन्ही फलंदाज अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर कायम राहिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयसीसीच्या सर्वोत्तम १० वन-डे क्रमवारीतले भारतीय फलंदाज –

१) विराट कोहली
२) रोहित शर्मा<br /> ९) शिखर धवन

आयसीसीच्या सर्वोत्तम १० वन-डे क्रमवारीतले भारतीय गोलंदाज –

१) जसप्रीत बुमराह<br /> ३) कुलदीप यादव<br /> ८) युझवेंद्र चहल

अवश्य वाचा – ICC Test Rankings : भारत, विराट अव्वलच; जाडेजाची क्रमवारीत घसरण

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc odi rankings virat kohli jasprit bumrah remain top chahal reaches career high