PCB On World Cup 2023: आशिया चषकाच्या हायब्रीड मॉडेलवर सहमती दर्शविल्यानंतर आता पाकिस्तानने विश्वचषकाबाबत नाटक सुरू केले आहे. या वर्षाच्या अखेरीस, एकदिवसीय विश्वचषक भारताला यजमानपद मिळणार आहे. आता पीसीबीने याबाबत नवा मुद्दा उपस्थित केला आहे. आशिया चषकाचा वाद मिटल्यानंतर विश्वचषकाबाबत काही गोष्टी स्पष्ट होतील, अशी आशा व्यक्त केली जात होती, मात्र याच दरम्यान पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी मोठे विधान करत यात खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पाकिस्तान संघाचा दृष्टिकोन बदलला

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी यांनी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील आपल्या संघाच्या सहभागावर शंका उपस्थित केली. शुक्रवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, “पीसीबी सरकारच्या मान्यतेच्या अधीन आहे. जर पाकिस्तान सरकारने आम्हाला भारतात जाण्याची परवानगी दिली तरच जाऊ, नाहीतर आम्ही विश्वचषकात सहभागी होणार नाही.” आता नजम सेठींच्या या अटींमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) विश्वचषकाचे वेळापत्रक निश्चित करणे कठीण होईल. याआधी, अलीकडेच, पाकिस्तानने हायब्रीड मॉडेल अंतर्गत आशिया चषक आयोजित करण्याचे मान्य केले आहे.

हेही वाचा: Cricket Record: W, W, W, W, W, W; क्रिकेट इतिहासातला मोठा विक्रम! ‘या’ खेळाडूने घेतल्या एकाच षटकात सहा विकेट्स

नजम सेठी यांनी पत्रकारांशी पुढे बोलताना सांगितले की, “जोपर्यंत भारत आणि पाकिस्तानचा संबंध आहे, त्याबाबत बीसीसीआय किंवा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. यामध्ये दोन्ही देशांच्या संबंधित सरकारांवर निर्णय अवलंबून आहे. त्यामुळे सरकारच्या मान्यतेनंतरच आम्ही आमचा संघ भारतात पाठवण्याचा निर्णय घेऊ शकू. जसे भारताने आशिया चषकासंदर्भात त्यांच्या सरकारने पाकिस्तानात पाठवायचं की नाही हा निर्णय घेतला, तसाच निर्णय विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जायचे की नाही हा निर्णय पाकिस्तान सरकार घेईल.”

बीसीसीआयवर केले मोठे वक्तव्य

बीसीसीआयवर सेठी यांची टिप्पणी देखील आश्चर्यकारक आहे कारण, आशियाई क्रिकेट परिषद (ACC) प्रमुख जय शाह यांच्यासह सर्व भागधारकांनी PCB प्रमुखांना प्रस्तावित ‘हायब्रीड मॉडेल’वर आशिया चषक आयोजित करण्यास सहमती दर्शविली आहे. पीसीबी अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “भारतातील विश्वचषकाच्या सहभागाबाबत आयसीसीसमोर काही अटी व शर्थी ठेवल्या आहेत. त्याबाबत समाधानकारक उत्तर मिळाल्यास पाकिस्तान सरकार योग्य तो निर्णय घेईल.”

हेही वाचा: IND vs WI: रोहित-हार्दिकला वेस्ट इंडीज दौऱ्यावर मिळणार विश्रांती? ‘हा’ खेळाडू असणार टीम इंडियाचा नवा कॅप्टन, जाणून घ्या

पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही?

पीसीबी चेअरमन म्हणाले, “आमच्या सरकारने या प्रकरणी निर्णय घ्यायचा आहे, जेव्हा भारताचा प्रश्न येतो तेव्हा ते कुठे खेळणार हे त्यांचे सरकार ठरवते. आम्ही अहमदाबादमध्ये खेळू की नाही, असे विचारण्यात अर्थ नाही. पुढे ते म्हणाले, “वेळ आल्यावर ठरवले जाईल की आम्ही जात आहोत की नाही, मग आम्ही कुठे खेळायचे हे सरकार ठरवेल. या दोन महत्त्वाच्या अटींवर आमचा निर्णय होईल.”