अहमदाबाद : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यापाठोपाठ अंतिम सामन्यापूर्वीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) खेळपट्टी सल्लागार अँडी अ‍ॅटकिन्सन चर्चेत आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे होणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या ४८ तासांपूर्वी खेळपट्टीच्या तयारीदरम्यान अ‍ॅटकिन्सन दिसले नाहीत. त्यामुळे त्यांच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. अ‍ॅटकिन्सन मायदेशी न्यूझीलंडला परतल्याची आधी चर्चा सुरू होती. मात्र, नंतर अ‍ॅटकिन्सन भारतातच असून आज, शनिवारी खेळपट्टीची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

‘‘अ‍ॅटकिन्सन मायदेशी परतलेले नाहीत. ‘आयसीसी’च्या पथकासह ते शुक्रवारी दुपारी अहमदाबाद येथे दाखल झाले. ते केवळ मैदानावर आले नाहीत. मात्र, शनिवारी ते मैदानावर येतील आणि खेळपट्टीची पाहणी करतील,’’ असे ‘आयसीसी’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> भारताचा सामना करण्यास सज्ज – मिचेल स्टार्क

अ‍ॅटकिन्सन यांनी भारत आणि न्यूझीलंडदरम्यान झालेल्या उपांत्य सामन्यापूर्वी यजमान देशाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी अचानक बदलल्याचा आरोप केला होता. तेव्हापासूनच ‘बीसीसीआय’चे अधिकारी त्यांच्यावर नाराज आहेत.

या सगळय़ानंतर बाद फेरीत नव्या खेळपट्टीवरच सामना आयोजित केला जावा, असा कोणताही नियम नाही आणि अ‍ॅटकिन्सन यांना यापूर्वीच याची कल्पना देण्यात आली होती, असे स्पष्टीकरण ‘आयसीसी’कडून देण्यात आले होते. वानखेडेवर झालेला उपांत्य सामना आधी नव्या खेळपट्टीवर खेळला जाणार होता. मात्र, नंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने हा सामना आधी वापरलेल्या खेळपट्टीवर खेळण्यास पसंती दर्शवली होती.

शुक्रवारी ‘बीसीसीआय’च्या मैदान कर्मचाऱ्यांचे प्रमुख आशीष भौमिक व उपप्रमुख तपोश चॅटर्जी यांच्यासह माजी भारतीय गोलंदाज आणि ‘बीसीसीआय’च्या स्थानिक क्रिकेटचे महाव्यवस्थापक अ‍ॅबी कुरुविला यांनी रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी खेळपट्टीच्या तयारीचे निरीक्षण केले. अंतिम सामना नवीन की वापरलेल्या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, ही खेळपट्टी संथ असू शकेल असे मत राज्य संघटनेच्या खेळपट्टी देखरेखकाराने व्यक्त केले.

हेही वाचा >>> विश्वचषक भारतच जिंकणार! माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना विश्वास

रोहित, द्रविडकडून पाहणी भारताचा कर्णधार रोहित शर्मासह केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी शुक्रवारी कसून सराव केला. तसेच, राखीव खेळाडू इशान किशन, रविचंद्रन अश्विन आणि प्रसिध कृष्णाही त्यांच्यासोबत होते. रोहित आणि द्रविड यांनी खेळपट्टीची पाहणी केली आणि दोन्ही खेळपट्टी देखरेखकारांशी चर्चाही केली.