ICC Apologies Team India: आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पुन्हा एकदा नंबर-२ वर आली आहे. बुधवारी (१५ फेब्रुवारी) दुपारी १.३० वाजता टीम इंडिया कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होती. पण संध्याकाळपर्यंत ती नंबर-२ वर आली आहे. ऑस्ट्रेलियन संघ आता पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे. गेल्या महिन्यातही आयसीसीच्या वेबसाईटने भारताला कसोटी क्रमवारीत नंबर-१ घोषित केले होते, कदाचित तांत्रिक दोषामुळे, पण त्यावेळीही काही तासांनंतर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आली होती. यावर आयसीसीने बीसीसीआयची माफी मागितली आहे.
खरं तर, आयसीसीने बुधवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये भारतीय संघ नंबर-१ वर पोहोचला. पण तांत्रिक चुकीमुळे नंबर-१ बनल्यानंतर अवघ्या ६ तासांत संघ दुसऱ्या क्रमांकावर घसरला. या गदारोळामुळे बोर्डाला मोठ्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. यानंतर त्यांनी टीम इंडियाची माफी मागितले. निवेदन जारी करताना आयसीसीने म्हटले आहे की, “आयसीसीने मान्य केले आहे की १५ फेब्रुवारी २०२३ रोजी तांत्रिक त्रुटीमुळे भारताला आयसीसी वेबसाइटवर नंबर १ कसोटी संघ म्हणून दाखवण्यात आले. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.”
टीम इंडियासोबत केली आयसीसीने मस्करी
वास्तविक, असे झाले की, आयसीसीने जारी केलेल्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी पोहोचली आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-१ संघ बनला. मात्र त्यानंतर लगेचच कसोटी क्रमवारीत भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने तांत्रिक त्रुटीमुळे दुसरे स्थान मिळवले. मात्र, भारताचे ११५ गुण असून कांगारू संघाचे १२६ गुण आहेत. यासह रोहित शर्माचा संघ दुसऱ्या स्थानावर तर ऑस्ट्रियाचा संघ पहिल्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे तांत्रिक बिघाडांमुळे भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
आता भारतीय संघाला पुन्हा कसोटी क्रमवारीत नंबर-१ होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. टीम इंडिया याआधी तीन वेळा नंबर-१ बनली आहे. १९७३ मध्ये ती पहिल्यांदा कसोटी क्रमवारीत नंबर-१ बनली. प्रदीर्घ कालावधीनंतर २००९ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कसोटीत अव्वल स्थान मिळवले. यानंतर, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया २०१६ मध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आणि चार वर्षे नंबर-१ राहिली.