ICC Rankings Jasprit Bumrah Becomes No1 Test Bowler: भारत आणि बांगलादेश २ सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर आयसीसीने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या कसोटी मालिकेत टीम इंडियाने दणदणीत बांगलादेशवर दणदणीत विजय तर नोंदवलाच पण कसोटी क्रमवारीतही भारतीय खेळाडूंनी बाजी मारली आहे. चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा २८० धावांनी पराभव केला आणि त्यानंतर कानपूरमधील दुसरी कसोटी ७ विकेट्सने जिंकून बांगलादेशचा मालिकेत २-० असा धुव्वा उडवला.

बांगलादेशविरूद्धच्या या कसोटी मालिकेत आर अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि रवींद्र जडेजा यांनी चेंडूने आश्चर्यकारक कामगिरी केली. आर अश्विन आणि बुमराहने प्रत्येकी ११ विकेट्स घेतल्या या दोघांनीही बांगलादेशविरुद्ध समान संख्येने विकेट घेतल्या, परंतु ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत फक्त एकाच गोलंदाजाला फायदा झाला. जसप्रीत बुमराहने आता आर अश्विनला मागे टाकले आहे आणि आता बुमराह कसोटी क्रमवारीत जगातील अव्वल गोलंदाज ठरला आहे.

India Becomes First Team in 21st Century to Declared the First Innings under 35 overs in IND vs BAN Kanpur Test
IND vs BAN: टीम इंडियाने कानपूर कसोटीत लिहिला नवा इतिहास, २१व्या शतकात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Vaibhav Suryavanshi scores fastest hundred for India in U19
Vaibhav Suryavanshi : १३ वर्षीय फलंदाजाने केला मोठा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले वादळी शतक
IND vs BAN 2nd Test Match Updates in Marathi
IND vs BAN : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत केला नवा विश्वविक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ
SL vs NZ Kamindu Mendis creates record of most successive fifty plus scores since Test debut
SL vs NZ: ८ कसोटी, ८ अर्धशतकं; कामिंदू मेंडिसने रचला विश्वविक्रम, ही कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू
IND vs BAN Wasim Akram on Rishabh Pant
Miracle Kid : ऋषभ पंतवर वसीम अक्रमचा स्तुतीसुमनांचा वर्षाव
IND vs BAN Ravichandran Ashwin Broke Anil Kumble Record
IND vs BAN : अश्विन अण्णाची फलंदाजीनंतर गोलंदाजीतही कमाल, अनिल कुंबळेचा विक्रम मोडत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
Travis Head Broke Rohit Sharma Record in ENG vs AUS ODI
ENG vs AUS: ट्रेव्हिस हेडने विक्रमी खेळीसह मोडला रोहित शर्माचा वनडेमधील मोठा विक्रम, ‘बॅझबॉल’चाही उडवला धुव्वा

हेही वाचा – IND vs BAN: “भले आम्ही १०० वर ऑल आऊट झालो असतो पण…”, भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, नेमकं म्हणाला तरी काय?

आयसीसीने नवीन जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, बुमराहने अव्वल स्थान गाठले असून, आर अश्विनला दुसऱ्या स्थानावर टाकले आहे. कानपूरमध्ये भारताच्या बांगलादेशविरुद्धच्या सात विकेट्सने विजयी झालेल्या सामन्यात बुमराहने ६ विकेट्स घेत आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. अश्विनने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एकूण पाच विकेट घेतल्या आणि आता बुमराहच्या ८७० रेटिंग गुणांपेक्षा फक्त एक गुण मागे आहे.

हेही वाचा – IND vs NZ: भारत दौऱ्यापूर्वी टीम साऊदीकडून न्यूझीलंडच्या कर्णधारपदाचा राजीनामा, ‘या’ खेळाडूकडे संघाची कमान

आर अश्विन या वर्षी मार्चमध्ये नंबर-१ कसोटी गोलंदाज बनला होता. बुमराह दुसऱ्यांदा कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेच्या प्रभात जयसूर्याला टॉप-१० गोलंदाजांच्या यादीत एका स्थानाचा फायदा झाला असून तो आता ८व्या स्थानावर पोहोचला आहे. कसोटी गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत भारताचे २, ऑस्ट्रेलियाचे २ आणि दक्षिण आफ्रिकेच्या एका गोलंदाजाचा समावेश आहे. तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स आहे. कागिसो रबाडा पाचव्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IND vs BAN कसोटी मालिकेत २ बेस्ट फिल्डर, रोहित-सिराज-यशस्वी-राहुल; कोणाला मिळालं मेडल? पाहा VIDEO

ICC Test Bowler Rankings: ताजी कसोटी क्रमवारी

जसप्रीत बुमराह- ८७० रेटिंग गुण
आर अश्विन- ८६९ रेटिंग गुण
जोश हेझलवूड- ८४७ रेटिंग गुण
पॅट कमिन्स- ८२० रेटिंग गुण
कागिसो रबाडा- ८२० रेटिंग गुण