ICC ODI Ranking: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आयसीसी वन डे क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत सिराजने हनुमान उडी घेत पहिले स्थान पटकावले आहे, त्याला आठ स्थानांचा फायदा झाला. तो थेट नवव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर गेला. आशिया कप फायनलमध्ये जबरदस्त गोलंदाजीचा फायदा सिराजला झाला. त्याने अंतिम सामन्यात २१ धावांत सहा विकेट्स घेतल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ज्याला ‘मिया’ म्हणून लाडाने ओळखतात असा मोहम्मद सिराज वन-डे फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या त्याच्या जादुई कामगिरीनंतर त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला पहिल्या स्थानावरून मागे खेचतत आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. सिराजने हे स्थान दुसऱ्यांदा मिळवले आहे.

मोहम्मद सिराजने याआधी याच वर्षी जानेवारीत आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतही पहिले स्थान पटकावले होते, त्यानंतर मार्चमध्ये जोश हेझलवूडने त्याची जागा घेतली होती. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या आशिया कप फायनलमध्ये सिराजने ७ षटकात २१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीचे त्याला बक्षिस मिळाले आहे. या गोलंदाजाने आशिया कपमध्ये एकूण १० विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय त्याने ट्रेंट बोल्ट, राशिद खान आणि मिचेल स्टार्क सारख्या गोलंदाजांनाही मागे टाकले आहे.

अफगाणिस्तानचे फिरकीपटू मुजीब उर रहमान आणि राशिद यांनी एकदिवसीय क्रमवारीतील गोलंदाजांमध्ये अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर सुधारणा केली आहे. सिराज व्यतिरिक्त, अव्वल १० मध्ये फक्त दोनच गोलंदाज होते ज्यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. दुखापतीतून पुनरागमन केलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने क्रमवारीत बरीच प्रगती केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले दोन सामने गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेला महाराजांनी शेवटचे तीन सामने जिंकून मालिका काबीज करण्यास मदत केली. या डावखुऱ्या फिरकीपटूने पाचव्या एकदिवसीय सामन्यात ३३ धावांत चार विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याने एकूण आठ विकेट्स घेतल्या. तो सध्या १५व्या स्थानावर आहे. त्याची एकदिवसीय कारकिर्दीतील ही सर्वोत्तम क्रमवारी आहे.

एकदिवसीय फलंदाजी क्रमवारी

आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीतही अनेक खेळाडूंना फायदा झाला. दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात आतापर्यंतची सर्वात विस्फोटक खेळी खेळली. सेंच्युरियन येथे, क्लासेनच्या २०९.६४च्या स्ट्राइक रेटने १७४ धावा झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने १६४ धावांनी विजय नोंदवला. एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत क्लासेनने २० स्थानांची प्रगती केली आहे. तो आता नवव्या स्थानावर आहे. यासोबतच भारताचा महान फलंदाज विराट कोहलीलाही एका स्थानाचा फायदा झाला असून तो आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत इंग्लंडचा डेव्हिड मलान चमकदार कामगिरी केली. त्याने ९२.३३च्या सरासरीने आणि १०५.७२च्या स्ट्राइक रेटने २७७ धावा केल्या आणि मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. कारकिर्दीच्या सुरुवातीला आयसीसी टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या या फलंदाजाने एकदिवसीय क्रमवारीतही बरीच प्रगती केली आहे, तो १३व्या स्थानावर पोहोचला आहे. ओव्हलवर १८२ धावांची स्फोटक खेळी खेळून एकदिवसीय क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन करणारा मलानचा देशबांधव बेन स्टोक्स फलंदाजी क्रमवारीत ३६व्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा: Team India: Adidasने वर्ल्डकप २०२३साठी केली नवी जर्सी लाँच, ‘या’ स्वरुपात दिसणार तिरंगा; रोहित-विराटचा Video व्हायरल

भारताचा सलामीवीर शुबमन गिल पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमला टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. बाबर ८५७ पॉईंट्सह अव्वल स्थानावर आहे, परंतु गिलने ताज्या क्रमवारीत त्याचे व बाबर यांच्यातील पॉईंट्सचे अंतर ४३ ने कमी केले आहे. गिल ८१४ पॉईंट्सस दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc rankings mohammad siraj became the worlds number one odi bowler success came from asia cup final feat avw