टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे दोघेही आपली यशस्वी घोडदौड सुरु ठेवत ICCच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहेत. कोहली ८८४ गुणांसह फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल आहे. तर गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह ७९७ गुणांसह अव्वलस्थानी विराजमान आहे. मात्र टीम इंडिया क्रमवारीत १२२ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या यादीत इंग्लंड १२७ गुणांसह पहिले स्थान राखून आहे. आणि आता इंग्लंडचा संघ श्रीलंकेशी एकदिवसीय मालिका खेळत आहे. आपले अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी इंग्लंडला श्रीलंकेविरुद्ध पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवावा लागेल. ही मालिका जर इंग्लंडने गमावली, तर भारताला आपोआप पहिला क्रमांक मिळण्याची शक्यता आहे. भारत २१ आॅक्टोबरपासून विंडीजविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. अशा परिस्थितीमध्ये भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ आपल्या मालिकेतील सर्व सामने जिंकले, तर मात्र त्यांना प्रत्येकी एका गुणाचा फायदा होणार असून क्रमवारी ‘जैसे थे’ राहणार आहे.

दरम्यान, आशिया चषक स्पर्धेतील भारताच्या कामगिरीचे खेळाडूंना फळ मिळाले आहे. या क्रमवारीनुसार कोहली पहिल्या स्थानी कायम आहे. तर उपकर्णधार रोहित शर्मा ८४२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. याशिवाय, ‘टॉप १०’मध्ये सलामीवीर शिखर धवनदेखील ८०२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

गोलंदाजाच्या क्रमवारीत फिरकीपटू कुलदीप यादव ७०० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या स्थानी अफगाणिस्तानच्या राशिद खाने याने ७८८ गुणांसह स्थान मिळवले आहे. युजवेंद्र चहलला मात्र टॉप १० मध्ये स्थान मिळवता आलेले नाही. तो सध्या ११व्या स्थानी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc rankings team india can get top spot if england lose odi series
Show comments