ICC shared the photos of Team India’s photo shoot: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऑस्ट्रेलिया आणि भारताची तयारी जोरात सुरू आहे. या विजेतेपदासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही विजेतेपदाची लढत ७ जूनपासून सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाने कसोटीची जर्सी घालून फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मापासून विराट कोहलीपर्यंतची संपूर्ण टीम दिसत आहे. याबाबतची माहिती स्वत: आयसीसीने ट्विट करुन दिली आहे.

फोटोशूटमध्ये टीम इंडियाची दिसली आक्रमकता –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीपूर्वी भारतीय संघाने नवीन जर्सीमध्ये फोटोशूट केले आहे. भारतीय संघाच्या फोटोशूटची फोटो स्वतः आयसीसीने आपल्या अधिकृत अकाउंटवरून शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, शुबमन गिल, आर अश्विनसह संपूर्ण टीम दिसत आहे. भारतीय संघाच्या या फोटोशूटमध्ये सर्व खेळाडू खूपच आक्रमक दिसत आहेत. भारतीय संघाच्या या फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसेच हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत.

भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी सतत मेहनत करत आहे. विजेतेपदाच्या लढतीपूर्वी संघाचे सर्व खेळाडू मैदानावर कसून सराव करत आहेत. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधी भारतीय संघ डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

हेही वाचा – Rishabh Pant Tweet: ऋषभ पंतने फक्त सहा शब्दांत व्यक्त केल्या भावना; म्हणाला, ‘या’ गोष्टीला करतोय सर्वात जास्त मिस

त्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा स्थितीत यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेतेपदासाठी झुंज देईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहेत. दोन्ही संघांमध्ये हा सामना चुरशीचा असेल मात्र यात कोण विजयी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Story img Loader