गोलंदाजांची संशयास्पद शैली व नॉन-स्ट्रायकर फलंदाजास धावबाद करणे या घटनांबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीच्या बैठकीत विचारमंथन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ही बैठक झाली. त्यामध्ये क्रिकेट संदर्भातील विविध समस्यांवर ऊहापोह झाले. आयपीएल स्पर्धेत दोन-तीन गोलंदाजांच्या शैलीबाबत आक्षेप घेण्यात आले होते. अशा गोलंदाजांची शैली वारंवार तपासण्याची आवश्यकता आहे व त्यांना त्यांची शैली सुधारण्याबाबत सविस्तर सूचना दिल्या जाव्यात असे या बैठकीत मत व्यक्त करण्यात आले.
सध्या अशी गोलंदाजी तपासण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा पुरेशी नाही याकडेही या बैठकीत लक्ष वेधून घेण्यात आले. कुंबळे यांच्या समितीने या संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा व्हावी अशी सूचनाही केली आहे. पीटीआय, बंगळुरू
गोलंदाजांची संशयास्पद शैली व नॉन-स्ट्रायकर फलंदाजास धावबाद करणे या घटनांबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीच्या बैठकीत विचारमंथन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ही बैठक झाली. त्यामध्ये क्रिकेट संदर्भातील विविध समस्यांवर ऊहापोह झाले. आयपीएल स्पर्धेत दोन-तीन गोलंदाजांच्या शैलीबाबत आक्षेप घेण्यात आले होते. अशा गोलंदाजांची शैली वारंवार तपासण्याची आवश्यकता आहे व त्यांना त्यांची शैली सुधारण्याबाबत सविस्तर सूचना दिल्या जाव्यात असे या बैठकीत मत व्यक्त करण्यात आले.
सध्या अशी गोलंदाजी तपासण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा पुरेशी नाही याकडेही या बैठकीत लक्ष वेधून घेण्यात आले. कुंबळे यांच्या समितीने या संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा व्हावी अशी सूचनाही केली आहे.

Story img Loader