आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने केलेल्या चौकशीवरुन पुण्यातील गहुंजे मैदानाच्या खेळपट्टीचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांना सहा महिन्यांच्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. साळगावकर यांच्यावर पुण्याच्या मैदानातील खेळपट्टीचे तपशील बुकींना विकल्याचा आरोप होता. मात्र आयसीसीने केलेल्या चौकशीत साळगावकर यांनी कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचाराला पाठींबा दिल्याचं समोर आलं नाही. त्यामुळे पुण्याच्या मैदानातील खेळपट्टीचे तपशील अनोळखी व्यक्तीला सांगितल्याप्रकरणी साळगावकर यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. साळगावकर यांनी आयसीसीच्या २.४.४ नियमांचा भंग केल्याचं समजतंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“इंडिया टुडे या वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या आधारावर आम्ही साळगावकर यांची कसून चौकशी केली. यासाठी वाहिनीच्या पत्रकारांनी केलेल्या शुटींगचाही अभ्यास करण्यात आलेला आहे. मात्र आमच्या चौकशीत इंडिया टुडे या वृत्तवाहिनीने साळगावकर यांच्यावर केलेला एकही आरोप सिद्ध झालेला नाहीये. मात्र साळगावकर हे आयसीसी नियमांना बांधील असून, आपल्याकडे एक व्यक्ती खेळपट्टीचे तपशील मागण्यासाठी आला होता ही बाब त्यांनी आयसीसीला कळवणं गरजेचं होतं. ही बाब त्यांच्याकडून न झाल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.” आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुथ अॅलेक्स मार्शल यांनी माहिती दिली.

आयसीसीने केलेल्या चौकशीत साळगावकर यांनी आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे २५ ऑक्टोबर २०१७ ही तारीख ग्राह्य धरुन त्यांच्यावर सहा महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. २४ एप्रिल २०१८ नंतर साळगावकर पुण्याच्या मैदानात आपलं क्युरेटरचं काम करु शकणार असल्याचंही आयसीसीने अवर्जून नमूद केलंय.