बांगलादेश प्रीमिअर क्रिकेट लीगमध्ये (बीपीएल) मॅचफिक्सिंग केल्याच्या आरोपाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सात खेळाडूंची हकालपट्टी केली असून अन्य दोन खेळाडूंवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले आहेत.
या खेळाडूंची नावे जाहीर करण्यास आयसीसीने नकार दिला आहे. मात्र या खेळाडूंविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आल्याचे आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले. कारवाईची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या खेळाडूंची नावे जाहीर केली जाणार आहेत.
आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी केली. २०१३ मध्ये झालेल्या
बांगलादेश लीगमध्ये या खेळाडूंनी भ्रष्टाचार विरोधी नियमावलींचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आले आहे. ढाका ग्लॅडिएटर्स या फ्रँचाईजीशी संबंधित हे खेळाडू आहेत. त्यांनी स्पॉटफिक्सिंग केले असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला जाणार आहे, असे आयसीसीने पत्रकात म्हटले आहे.