आशिया चषकात पाकिस्तान संघाची कामगिरी लयबद्ध पद्धतीने सुरू आहे. या स्पर्धेत झालेल्या ३ सामन्यांमध्ये पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद रिझवानने आक्रमक फलंदाजी केली. त्याने ३ सामन्यांत दोन वेळा अर्धशतकी खेळी करत १९२ धावा ठोकल्या. त्यात आता आयसीसीने टी-२० क्रमवारी जाहीर झाली आहे. त्यामध्ये आयसीसीने मोहम्मद रिझवानला सुखद धक्का दिला आहे.

आयसीसी टी-२० क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मोहम्मद रिझवानने मागे टाकलं आहे. टी-२० क्रमवारीत रिझवान हा पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. तर, बाबर आझम दुसऱ्या स्थानी गेला आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करम तिसऱ्या, तर चौथ्या क्रमांकावर भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव आहे.

आशिया चषक स्पर्धेत रिझवान जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. तर, या स्पर्धेत बाबर आझमने मोठी धावसंख्या उभारली नाही. त्यामुळे बाबरला रिझवानसाठी आपली एक नंबरची जागा सोडावी लागली आहे. बाबर ११५५ दिवस टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. तसेच, रिझवान हा तिसरा पाकिस्तानी फलंदाज आहे, जो टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमाकांवर गेला आहे. यापूर्वी, बाबर आझम आणि मिस्बाह उल-हक यांनी ही कामगिरी केली होती.

कोणाकडे किती गुण?

टी-२० क्रमवारीत ८१५ गुणांसह मोहम्मद रिझवान प्रथम स्थानी आहे. बाबर आझम ७९४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. मार्करमने सूर्यकुमार यादवा मागे टाकल तिसरा क्रमांक पटकवला आहे. मार्करमकडे ७९२ तर सूर्यकुमारकडे ७७५ गुण आहेत. डेव्हिड मलान पाचव्या स्थानावर आहे. टी-२० अव्वल १० फलंदाजांच्या क्रमवारीत भारतातील फक्त एका खेळाडूचा समावेश आहे.

Story img Loader