आयसीसी टी२० क्रमवारीत भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवची राजवट कायम आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही तो पहिल्या स्थानावर कायम आहे. टी२० विश्वचषकात २३९ धावा करणाऱ्या सूर्यकुमारने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक १२४ धावा केल्या आणि फक्त एकदाच तो बाद झाला. दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद १११ धावा केल्या आणि कारकिर्दीतील सर्वोत्तम ८९५ धावा केल्या. मात्र, पुढच्या सामन्यात ते १३ धावा करून तंबूत परतले आणि पाच गुण गमावले.

सध्या सूर्यकुमार यादव ८९० गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तो दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मोहम्मद रिझवानपेक्षा ५४ गुणांनी पुढे आहे, ज्याचे ८३६ रेटिंग गुण आहेत. न्यूझीलंडच्या डेव्हन कॉनवेने दुसऱ्या सामन्यात शानदार फलंदाजी केली आणि बाबर आझमला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कॉनवेचे ७८८ गुण आहेत. त्याचवेळी चौथ्या स्थानावर असलेल्या बाबरचे ७७८ गुण आहेत.

India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
Sanju Samson Creates History With 2nd Consecutive T20I Century Becomes First Indian Batsman IND vs SA
Sanju Samson Century: संजू सॅमसनने शतकासह घडवला इतिहास, टी-२० इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू

भारताच्या इशान किशनलाही त्याच्या चांगल्या फलंदाजीचा फायदा झाला असून तो १० स्थानांनी पुढे ३३व्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडच्या केन विल्यमसनलाही एक स्थानाचा फायदा झाला असून तो सातव्या स्थानावर आहे, तर ग्लेन फिलिप्सने पाच स्थानांची सुधारणा करत ३५व्या स्थानावर आहे.

हेही वाचा :   FIFA World Cup 2022: “२०२२ च्या विश्वचषकाची २०१८ च्या…” क्रोएशियाचा लुका मॉड्रिकचे सामन्याआधी मोठे विधान

गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल १० मध्ये कोणताही बदल झालेला नाही पण भारताच्या भुवनेश्वर कुमारने दोन स्थानांचा फायदा मिळवून ११व्या स्थानावर पोहोचले आहे. न्यूझीलंडच्या टीम साऊदीनेही दोन स्थानांची प्रगती करत १४व्या स्थानावर पोहोचले आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सौदीने हॅटट्रिक घेतली.