यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेसाठी तिकीट विक्री सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांचा सामना क्रिकेटरसिंकांसाठी पर्वणी ठरतो. हे दोन्ही संघ भिडतात, तेव्हा चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. तिकीट खरेदीतही तेच दिसून आले. टी-२० विश्वचषक २०२२मधील भारत-पाकिस्तान (T20 WC- IND vs PAK) सामना मेलबर्न येथे होणार आहे, या सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच विकली गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही स्पर्धा १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. यासाठी चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामन्याचा आनंद लुटता यावा या उद्देशाने तिकीट खरेदी करता येणार आहे. ही तिकिटे t20worldcup.com वर उपलब्ध आहेत. यामध्ये फायनलसह ४५ सामन्यांची तिकिटे खरेदी करता येणार आहेत. “पहिल्या फेरीसाठी आणि सुपर १२ टप्प्यासाठी मुलांचे तिकीट पाच डॉलर आहे, तर प्रौढांचे तिकीट २० डॉलर आहे.

हेही वाचा – IPL 2022 : अहमदाबाद संघाचं नाव ठरलं..! ‘या’ नावानं ओळखली जाणार हार्दिक पंड्याची सेना

विश्वचषकाचे सामने अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे होतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार आरोन फिंच म्हणाला, ”आयसीसी टी-२० विश्वचषक शानदार असेल. प्रेक्षकांसमोर विजेतेपद राखण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.”