India Team For ICC Men’s T20 World Cup 2022: आयसीसी टी २० विश्वचषक २०२२, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका टी २० सामन्यांसाठी भारतीय संघांची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी आयसीसीने केलेल्या घोषणेनुसार भारत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेशसह सुपर १२ मध्ये आहेत. तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडचे चार संघ १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यास पात्र ठरण्यासाठी आमनेसामने असतील. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर १२ मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Asia Cup 2022 Price Money: आशिया चषक विजेत्या श्रीलंकेला कोट्यवधींचे बक्षीस; पाकिस्तानने किती रुपये जिंकले पाहा

टी २० विश्वचषकाचे सामने १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत, संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण पाच सामने खेळणार आहे. पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध, २७ ऑक्टोबर रोजी अ गटातील उपविजेत्यासह दुसरा, ३० ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा, त्यानंतर चौथा सामना २ नोव्हेंबर रोजी बांगलादेशशी आणि पाचवा सामना ६ नोव्हेंबर रोजी गट ब विजेत्यासह होईल.

ICC T20 विश्वचषकासाठी असा असणार भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू

मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

ऑस्ट्रेलिया टी-20 साठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मो. शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिका T20I साठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद. शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc t20 world cup 2022 rohit sharma captain kl rahul vice captain check entire team india squad svs