सलामीवीर मोहम्मद शहजाद आणि शफिउल्लाह यांच्या अर्धशतकांमुळे ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या साखळीमध्ये अफगाणी हल्ल्यापुढे हाँगकाँग बेचिराख झाला. एकतर्फी लढतीत अफगाणिस्तानने सात विकेट राखून विजय मिळवत आपले आव्हान टिकवले. परंतु हाँगकाँगचे विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.
प्रथम फलंदाजी करताना हाँगकाँगने २० षटकांत ८ बाद १५३ धावा केल्या. त्यामध्ये मार्क चॅपमन (३८), वकास बरकत (३२) व जेमी अॅटकिन्सन (३१) यांनी केलेल्या शैलीदार फलंदाजीचा मोठा वाटा होता. मोहम्मद शहजाद (६८) व शफीक उल्ला (नाबाद ५१) यांनी केलेल्या आक्रमक खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने १८ षटकांत केवळ तीन फलंदाजांच्या मोबदल्यात विजयासाठी असलेले १५४ धावांचे लक्ष्य पार केले.
संक्षिप्त धावफलक
हाँगकाँग : २० षटकांत ८ बाद १५३ (वकास बरकत ३२, जेमी अॅटकिन्सन ३१, मार्क चॅपमन ३८; शापूर झाद्रान २/२७, हामझा होतोक २/३२, महम्मद नबी २/२७) पराभूत वि. अफगाणिस्तान : १८ षटकांत ३ बाद १५४ (मोहम्मद शहजाद ६८, शफीक उल्ला नाबाद ५१; तन्वीर अफझल १/१९)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा